शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
5
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
6
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
7
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
8
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
9
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
10
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
11
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
12
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
13
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
14
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
15
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
16
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
17
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
18
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
19
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
20
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!

बटलर-राणाने पंजाबला रडवले

By admin | Updated: April 21, 2017 01:58 IST

जोस बटलर आणि नितीश राणा यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सलग पाचवा विजय मिळवताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा ८ विकेट्सने फडशा पाडला

ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 20 - जोस बटलर आणि नितीश राणा यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सलग पाचवा विजय मिळवताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा ८ विकेट्सने फडशा पाडला. पंजाबने दिलेले १९९ धावांचे भलेमोठे आव्हान मुंबईने तब्बल २७ चेंडू राखून सहजपणे परतावले. यासह पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावताना मुंबईने आपली धावगतीही मजबूत केली.

होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने हाशिम आमलाच्या (१०४*) शानदार शतकाच्या जोरावर निर्धारित षटकांत ४ बाद १९८ धावांची मजबूत मजल मारली. या वेळी मुंबई इंडियन्सचा अश्वमेध रोखला जाणार अशीच चर्चा होती. परंतु, बटलर - पार्थिव पटेल यांना हे मान्य नव्हते.या दोघांनी ३५ चेंडंूत ८१ धावांची वेगवान सलामी दिली. मार्कस स्टोइनिसने पार्थिवला (१८ चेंडूंत ३७) बाद केल्यानंतर मुंबईची धावगती कमी होईल असे वाटले. परंतु, यानंतर बटलर आणि राणा यांचा ‘शो’ सुरू झाला. दोघांनी समोर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला जबरदस्त बदडून काढले. पहिल्या डावात झालेल्या धुलाईचा वचपा काढताना बटलर-राणा यांनी पंजाबच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले. बटलरने ३७ चेंडूंत ७७ धावांचा तडाखा देताना ७ चौकार व ५ षटकारांचा नजराणा पेश केला. दुसरीकडे, राणाने यंदाच्या सत्रातील तिसरे अर्धशतक झळकावताना ३४ चेंडंूत ७ षटकार ठोकताना नाबाद ६२ धावा काढल्या. यासह त्याने ‘आॅरेंज कॅप’वरही कब्जा केला. बटलर परतल्यानंतर राणाने हार्दिक पांड्यासह (४ चेंडूंत नाबाद १५) मुंबईच्या विजयावर शिक्का मारला. तत्पूर्वी, पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पंजाबने आमलाच्या शतकी तडाख्याच्या जोरावर आव्हानात्मक मजल मारली. आमलाने जबरदस्त ‘हमला’ करताना ६० चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १०४ धावा कुटल्या. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलनेदेखील १८ चेंडंूत ४ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा काढल्या. मात्र, बटलर व राणा यांच्या धमाकेदार खेळीमुळे या दोघांची फटकेबाजी व्यर्थ ठरली. संक्षिप्त धावफलक :किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ४ बाद १९८ धावा (हाशिम आमला नाबाद १०४, ग्लेन मॅक्सवेल ४०; मिशेल मॅक्क्लेनघन २/४६) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १५.३ षटकांत २ बाद १९९ धावा (जोस बटलर ७७, नितीश राणा नाबाद ६२; मार्कस स्टोइनिस १/२८, मोहित शर्मा १/२९)