शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

budget 2021 : क्रीडा आणि युवक कल्याण कार्यक्रमाच्या बजेटला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 02:20 IST

budget 2021: कोरोना महामारीमुळे वर्षभर क्रीडा आयोजन ठप्प होते. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या रकमेवर झालेला दिसतो.

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे वर्षभर क्रीडा आयोजन ठप्प होते. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या रकमेवर झालेला दिसतो. २०२१-२२ चा सोमवारी अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये २५९६.१४ कोटी इतकीच तरतूद केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम २३०.७८ कोटी इतकी कमी आहे. मागच्या वर्षीच्या संशोधित निधीच्या तुलनेत ही रक्कम अधिक असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला. कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी स्थगित झाले होते, शिवाय स्थानिक स्पर्धांचे आयोजन रद्द करण्यात आले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विदेशात सराव करण्याची सोयदेखील नव्हती. ऑलिम्पिक तयारीसाठी खेळाडूंना विदेशात सराव करावा लागतो. त्याचा संपर्ण खर्च केंद्र शासनाकडून केला जातो.क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानुसार, मागच्या वर्षी सुरुवातीला २८२६.९२ कोटींची तरतूद करण्यात आली होती, नंतर ती रक्कम १८००.१५ कोटी इतकी घटविण्यात आली. कोरोनामुळे क्रीडा आयोजन नसल्याचे यामागे कारण देण्यात आले होते. खेळाच्या पायाभूत सोयी विकसित करण्यास विशेष लक्ष देण्यात आले नव्हते.राष्ट्रीय क्रीडा विकास कोषाला  २५ कोटी मिळाले आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) ६६०.४१ कोटी रुपये मिळाले आहेत. खेळाडू प्रोत्साहन योजनेची रक्कम  मात्र ७० कोटीहून ५३ कोटी रुपये करण्यात आली. २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनिमित्त उभारण्यात आलेल्या साई स्टेडियमच्या डागडुजीसाठी जी रक्कम लागते ती ७५ वरून ३० कोटी इतकी करण्यात आली आहे. 

खेलो इंडियासाठी २०२०-२१ साठी ८९०.४२ कोटीची तरतूद होती. २०२१-२२ साठी ही रक्कम ६५७.७१ कोटी इतकी असेल. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना देण्यात येणारा निधी २४५ कोटी रुपये होता. ही रक्कम १३२ कोटीवर आणण्यात आली आहे. पुढच्या आर्थिक वर्षासाठी मात्र २८० कोटी देण्याचे आश्वासन मिळाले आहे. 

टॅग्स :budget 2021बजेट 2021