शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटीश बॉक्सरच्या ताफ्यात 2.20 लाख पाऊंडच्या मॅक्लॅरेनची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 11:45 IST

ब्रिटीश बॉक्सर ख्रिस एयुबँक ज्यु. याच्या ताफ्यात नवीन कार दाखल झाली आहे.

ब्रिटीश बॉक्सर ख्रिस एयुबँक ज्यु. याच्या ताफ्यात नवीन कार दाखल झाली आहे. लंडन येथील O2 येथील अरेनात ख्रिस सुपर मिडलबेड कॅटेगरीत जेम्स डेगालेचा सामना करणार आहे. 2016 व 2017 मध्ये त्याने IBO सुपर- मिडलवेट गटाचे जेतेपद नावावर करणाऱ्या ख्रिसला जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी डेगालेशी मुकाबला करावा लागणार आहे. रविवारी हा सामना होणार आहे, परंतु तत्पूर्वी ख्रिसने आपल्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये मॅक्लॅरेनचा समावेश केला आहे.

ख्रिसने मॅक्लॅरेन 720S ही जवळपास 2.20 लाख पाऊंडची ( 2,03,15,299.73 भारतीय किंमत) गाडी खरेदी केली आहे. गतवर्षीच त्याने बेंटली ही कार खरेदी केली होती. मॅक्लॅरेन खरेदीबाबत ख्रिस म्हणाला,'' यावर्षी मी 30 वर्षांचा होईन आणि मला या कारचा मनसोक्त आनंद लुटायचा आहे. तुम्हाला एकच आयुष्य मिळते आणि ते मनसोक्त जगायला हवं. वयाच्या पन्नाशीत मॅक्लॅरेन चालवताना मी किती विचित्र दिसेन आणि मला कोणी ओळखणारही नाही.'' 

ख्रिस ज्यु. ने इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या नव्या कोऱ्या मॅक्लॅरेनचा व्हिडोओ पोस्ट केला आहे...  ख्रिस ज्यु. हा ख्रिस एयुबँक आणि कॅरोन सुजॅन स्टीफन मार्टिन यांचा मुलगा. पूर्व ससेक्स येथे 18 सप्टेंबर 1989 सालचा त्याचा जन्म. वयाच्या 16 व्या वर्षी ख्रिस भावासह अमेरिकेत स्थायिक झाला. 2007 मध्ये त्याने बॉक्सिंगला सुरुवात केली. त्यानंतर त्याने सहा हौशी लढती जिंकून नेव्हाडा राज्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला. हौशी बॉक्सिंग कारकिर्दीत त्याने 24 विजय मिळवले, तर केवळ 2 सामने गमावले. 

2011 मध्ये त्याने व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात केली. त्याने पुढील तीन वर्षांत 18 सामने जिंकले आणि त्यातील 13 सामने प्रतिस्पर्धींना नॉक आऊट करून जिंकले. त्यानंतर त्याने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये दबदबा निर्माण केला आहे.

टॅग्स :boxingबॉक्सिंग