शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बाराशे दिवसांनी उतरला ब्राझीलचा क्रीडाज्वर

By admin | Updated: September 19, 2016 20:07 IST

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या समारोपासोबत ब्राझीलवर गेले ११९२ दिवस चढलेला क्रीडा ज्वर उतरला आहे. या स्पर्धेच्या समाप्तीसह मोठ्या आणि प्रतिष्ठित स्पर्धेचे यशस्वी आयोजन

ऑनलाइन लोकमतरिओ डी जानेरो, दि. १९ : पॅरालिम्पिक स्पर्धेच्या समारोपासोबत ब्राझीलवर गेले ११९२ दिवस चढलेला क्रीडा ज्वर उतरला आहे. या स्पर्धेच्या समाप्तीसह मोठ्या आणि प्रतिष्ठित स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याच्या कसोटीवर ब्राझील खरा उतरला आहे.या शानदार पर्वाची सुरवात २0१३ मध्ये कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेपासून झाली होती. यानंतर २0१४ च्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या महिन्यात रिओने आॅलिम्पिक आयोजनाचे शिवधनुष्य पेलले, आणि त्यानंतर काल, रविवारी पॅरालिम्पिक स्पर्धेच्या सांगतेने हे क्रीडापर्व संपले.

ब्राझील हा विकसनशील देश असताना त्यांना या स्पर्धांचे यजमानपद सोपवण्यात आले होते. या स्पर्धांमुळे हा देश जगाचे आकर्षणाचे केंद्र बनला, परंतु या स्पर्धेचे गाडे हाकता हाकता ब्राझील मंदीच्या छायेत आला. तेथील सरकारी तेल कंपनी पेट्रोब्रासमध्ये एक अरब डॉलर्स इतक्या मोठ्या रक्कमेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने देशाला हादरवून सोडले. राष्ट्रपती दिलमा रोसफ यांना आॅलिम्पिक संपल्यानंतर काही दिवसांनी महाभियोग चालवून हटवण्यात आले. ब्राझीलने या स्पर्धांच्या आयोजनावर ३0 अरब डॉलर्सहून अधिक रक्कम खर्च केली, ज्यामध्ये जनतेच्या पैशासोबत खासगी क्षेत्रातूनही निधी उभारण्यात आला. फुटबॉल वर्ल्डकपसाठी चार नवीन स्टेडीयम उभारण्यात आली. ही चारही स्टेडीयम अशा शहरात उभारली होती की, या शहरातून एकही मोठा संघ देशातील स्पर्धेत खेळत नाही. त्यामुळे यांना पांढरा हत्ती संबोधण्यात येते.

रिओ आॅलिम्पिकच्या आयोजनाच्या निमित्ताने येथील मेट्रो सेवा सुधारण्यात आली. बस सेवा अत्याधुनिक झाली. परंतु हा सर्व विकास तिजुका सारख्या उच्चभ्रू भागात झाला. त्याशिवाय स्पर्धांच्या समाप्तीनंतर स्पर्धा स्थळाभोवतीच्या रिअल इस्टेट खूपच महागल्या.

प्रतिष्ठेच्यादृष्टीने विचार करता ब्राझीलला काही खूप मोठा फायदा झाला नाही. काही मोजकेच राजकिय नेते या स्पर्धेसाठी ब्राझीलमध्ये गेले. २0१२च्या लंडन आॅलिम्पिकदरम्यान शंभरहून अधिक सन्माननिय नेत्यांनी हजेरी लावली होती. तब्बल सव्वातीन वर्षे सुरु असलेले हे क्रीडा पर्व रविवारी समाप्त झाले. ब्राझीलवासियांवर उतरलेला क्रीडा ज्वर आता उतरला आहे.