शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

‘ब्राव्हो’चा कसोटीला गुडबाय

By admin | Updated: January 31, 2015 23:23 IST

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने कसोटी कारकिर्दीला गुडबाय केला आहे; पण वन-डे आणि टी-20 सामने मात्र खेळतच राहणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

पोर्ट आॅफ स्पेन : वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने कसोटी कारकिर्दीला गुडबाय केला आहे; पण वन-डे आणि टी-20 सामने मात्र खेळतच राहणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. ३१ वर्षीय ब्राव्होे २0१0पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ४0 कसोटी आणि १६४ वन-डे सामन्यांत वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करणारा ब्राव्हो म्हणाला, ‘‘आज मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाला याची मी कल्पना या अगोदरच दिली आहे.’’ त्याचबरोबर मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने खेळतच राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. आपल्या अष्टपैलू खेळामुळे विंडीज संघाचा महत्त्वाचा घटक असणारा ब्राव्हो हा बंडखोर खेळाडू म्हणून ओळखला जातो. खेळाडूंच्या मानधनाच्या प्रश्नावरून झालेल्या वादातून त्याच्या नेतृत्वाखालील संघाने भारत दौरा अर्धवट सोडला होता. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने विंंडीज मंडळावर नुकसानभरपाईची मागणी केली आहे. आधीच डबघाईला आलेल्या ‘डब्ल्यूआयसीबी’ला यामुळे मोठा तोटा सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. या सर्वांच्या मुळाशी ब्राव्हो असल्याचा समज मंडळाचा झाल्यामुळे ब्राव्होला विश्वकप संघातून वगळण्यात आले होते. ब्राव्होची कारकीर्दसामनेडावधावासर्वोच्च अर्धशतकेशतकेसरासरीकसोटी४0७१२२00११३१३0३३१.४२वन-डे१६४१४१२९६८१२२*१00२२५.३६टी-२00५३0४८0९३६६६*0३00२५.२९