मुंबई : न्यूझीलंडचा माजी जलदगती गोलंदाज व मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉँड याने ‘आयपीएल’मधील वेळापत्रक पाहता गोलंदाजांनी आपली जबाबदारी योग्य तऱ्हेने सांभाळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. या संदर्भात त्याने श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा याचे उदाहरण दिले आहे. मलिंगा सध्या फॉर्ममध्ये नाही. ‘मलिंगाला या सत्रात योग्य तऱ्हेने सांभाळण्यासाठी माझी मुंबईचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने व संघ व्यवस्थापनाबरोबर खूप चर्चा झाली आहे.’ असे सांगून तो म्हणाला, ‘आम्ही सर्वच गोलंदाजांबाबत सजग आहोत. जे दुखापतीतून नुकतेच बाहेर आले आहेत. त्यांचा वापर योग्य तऱ्हेने केला गेला पाहिजे.’ मुंबईने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत व ते गुणतालिकेत अग्रस्थानी आहेत.
गोलंदाजांनी जबाबदारी सांभाळणे गरजेचे : शेन बॉँड
By admin | Updated: April 27, 2017 01:32 IST