शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आता भागम् भाग.... वेगाचा बादशहा उसेन बोल्ट उतरतोय फुटबॉलच्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 15:41 IST

जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टचे फुटबॉलप्रेम जगजाहीर आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबचा चाहता असलेल्या बोल्टने अॅथलेटिक्स म्हणून निवृत्ती पत्करल्यानंतर फुटबॉलपटू होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

मुंबई - जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टचे फुटबॉलप्रेम जगजाहीर आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबचा चाहता असलेल्या बोल्टने अॅथलेटिक्स म्हणून निवृत्ती पत्करल्यानंतर फुटबॉलपटू होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलियातील सेंटर कोस्ट मरीनर्स क्लबसोबत त्याचा करारा अंतिम टप्प्यात आहे. क्लबमधील त्याच्या समावेशानंतर अन्य खेळाडूंना बोल्टच्या गतीशी जुळवून घेण्यासाठी भागम् भाग करावी लागणार आहे.नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ब्राझील संघाला चिअर करण्यासाठी तो थेट रशियात दाखल झाला होता. आठवेळा ऑलिम्पिक विजेतेपद पटकावणा-या 31 वर्षीय बोल्टने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो व्यावसायिक फुटबॉलपटू बनण्यासाठी उत्सुक होता. 100 आणि 200 मीटर शर्यतीत विश्वविक्रम नावावर असलेल्या या खेळाडूने नॉर्वेजीयन क्लब आणि बुंदेसलीगा क्लब बोरूसिया डोर्टमंड क्लबकडून फुटबॉलचे धडे गिरवले आहेत. सिडनीपासून 75 किलोमीटर दूर असलेल्या गोस्फोर्ड येथील मरीनर्स क्लबसोबत तो पुढील महिन्यापासून सहा आठवड्याच्या  सराव सत्रात सहभागी होणार आहे, असे क्लबचे मुख्य कार्यकारी शॉन मिएलेकॅम्प यांनी सांगितले. सराव सत्रात बोल्ट यशस्वी झाल्यास बोल्ट आणि मरीनर्स यांच्यात करार होणार आहे.  

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा