शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Blog: १८ व्या वर्षी तो निघालाय जग जिंकायला! प्रज्ञाननंदा सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगा

By स्वदेश घाणेकर | Updated: August 22, 2023 11:57 IST

Journey of R Praggnanandhaa - १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. FideWorldCup स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फॅबियानो कारूआनाचा ३ ५-२.५ असा पराभव केला.

- स्वदेश घाणेकर

Journey of R Praggnanandhaa - आजच्या पिढीतील १८ वर्षांची पोरं काय करतात? एक तर कुठल्या तरी नटाला आदर्श मानून फुकाची शायनिंग मारतात किंवा रिल्सच्या जाळ्यात अडकून पडलेली दिसतात... त्यात कोरोनाने त्यांना या सोशल मीडियाच्या अधिक जवळ आणले आणि भलेभले दिशा भरकटले... पण याच युवा पिढीतील एक सामान्य कुटुंबातील मुलगा असामान्य कार्य करतोय... आर प्रज्ञाननंदा असे या १८ वर्षीय मुलाचं नाव आहे..

साधं राहणीमान, दिसायलाही अगदी सामान्य...... पण मनात उंच झेप घेण्याची इच्छाशक्ती असलेला हा प्रज्ञाननंदा... आज त्याने जगाला भारतीयांचा हेवा वाटेल अशी कामगिरी केलीय.. अवघ्या १८ व्या वर्षी पठ्ठ्याने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली, तेही जागतिक क्रमवारीत तिसऱ्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिग्गजांना पराभूत करून... या स्पर्धेची फायनल गाठणारा तो विश्वनाथन आनंद यांच्यानंतर दुसरा भारतीय ठरला.. ( कदाचित सर्वात युवा भारतीय ) . आता त्याची गाठ मॅग्नस कार्लसन याच्याशी आहे...

कोरोनामुळे प्रज्ञाननंदच्या घोडदौडीला ब्रेक लागला होता, सुसाट पाळणारा त्याचा अश्वमेध संथ झालेला. पण प्रज्ञाननंदाने आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. वयाच्या १०व्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर बनणारा तो जागतिक युवा बुद्धिबळपटू बनला.. २०१८ मध्ये १२ व्या वर्षी त्याने ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आणि जगातील दुसरा युवा खेळाडू ठरला. १४व्या वर्षी त्याने २६०० ELO रेटिंग कमावले आणि पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.. 

बँकेत ब्रांच मॅनेजर वडील रमेशबाबू अन् आई नागालक्ष्मी गृहिणी... चेन्नईतील सामान्य कुटुंबातील प्रज्ञाननंदा... त्याची बहीण आर वैशाली ही महिला ग्रँडमास्टर आहे.. त्याने बहिणीसोबत जेव्हा बुद्धीबळ स्पर्धा जिंकली, तेव्हा चेन्नईतील आयोजकांनी पत्रकारांना हा मुलगा भविष्यातील स्टार आहे, यावर काही तरी स्टोरी करा असे सांगितले. डी.व्ही.सुंदर यांचे ते शब्द खरे ठरले. त्यावेळचा एक किस्सा असा की, त्याचं नाव उच्चारणं थोडं अवघडच आहे आणि त्यामुळे तुझ्या नावाचा नेमका उच्चार कसा होतो, असे त्याला विचारले गेले. त्याने लहानवयात ते न चुकता लिहून दाखवले अन् अभिमानाने सांगितले की, माझ्या नावात ५ A आहेत.. तेव्हा पत्रकार म्हणाले तू A class मुलगा आहे. त्यावर तो लगेच म्हणाला, नाही नाही. मी इयत्ता दुसरीत G Section मध्ये आहे.... असा हा प्रज्ञाननंदा साधाभोळा. तो त्याने आजही जपलाय..

घराबाहेर फार न फिरलेली त्याची आई ही प्रज्ञाननंदाची प्रेरणा आहे... तिचा साधेपणा प्रज्ञाननंदमध्ये जाणवतो... आई नागलक्ष्मी आज बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत प्रज्ञाननंदाचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित आहे... त्याची मॅच सुरू असताना एका कोपऱ्यात उभी राहून ती आपल्या मुलाची प्रगती डोळ्यांत साठवताना दिसतेय. आईसोबत सेल्फी घेण्यासाठी जगभरातील दिग्गज घोळका घालत आहेत... आपला मुलगा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या उंबरठ्यावर आहे याचा जराही माज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर नाही... सामान्य कुटुंबाची हीच ताकद आहे..

''मी आता दमलोय... या स्पर्धेत इथपर्यंत पोहचेन याचा विचार केला नव्हता. पण, आता फायनलला पोहोचल्यावर आनंद होतोय. या स्पर्धेत मॅग्नस याच्याविरुद्ध खेळेन याची अपेक्षा नव्हती, कारण त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी फायनलपर्यंत पोहोचणे हा एकमेव मार्ग होता आणि मी फायनलपर्यंत पोहोचेन याची मला अपेक्षा नव्हती. मी फायनलमध्ये सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन,''असे प्रांजळ मत प्रज्ञाननंदाने उपांत्य फेरीतील विजयानंतर व्यक्त केले.

असा हा सामान्य घरातील प्रज्ञाननंदा असामान्य कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय. 

टॅग्स :R Praggnanandhaaआर प्रज्ञाननंदाChennaiचेन्नई