शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

आश्विनपासून सर्वांत अधिक धोका : प्लेसिस

By admin | Updated: November 3, 2015 03:59 IST

टी-२० आणि वन-डे सामन्यांची मालिका जिंकल्यानंतरही पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आगामी कसोटी मालिकेत भारतातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत चिंता सतावत

मोहाली : टी-२० आणि वन-डे सामन्यांची मालिका जिंकल्यानंतरही पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आगामी कसोटी मालिकेत भारतातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत चिंता सतावत आहे. आगामी मालिकेत आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनला खेळणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान राहील, असे मत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू ुप्लेसिसने व्यक्त केले.आगामी कसोटी मालिकेत खेळपट्ट्या यजमान संघासाठी अनुकूल राहतील अशी आशा आहे का, याबाबत ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल राहील, अशी आशा आहे आणि त्यानुसार योजना आखली जाईल. माझ्या मते, भारतीय क्रिकेट पूर्वीच्या तुलनेत अधिक आक्रमक झाले आहे. सुरुवातीला भारतातील खेळपट्ट्याकडून तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती; पण आता पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर चेंडू वळायला सुरुवात होते.’’गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सोमवारी आयएस बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘याचा अर्थ, कसोटी सामना ५ दिवस चालणार नाही. कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपणार असेल, तर त्यादृष्टीने योजना आखून आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.’’ दुखापतीतून सावरल्यानंतर कसोटी मालिकेत पुनरागम करीत असलेल्या आश्विनच्या आव्हानाला सामोरे जाणे महत्त्वाचे ठरेल, असेही ड्युप्लेसिसने सांगितले. ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘आश्विन जागतिक दर्जाचा फिरीकपटू आहे; पण टी-२० मालिकेत आम्ही त्याला यशस्वीपणे सामोरे गेलो आहोत. आता कसोटी क्रिकेटचा प्रश्न आहे. येथे त्याला अधिक टर्न मिळेल.’’ड्युप्लेसिसने सांगितले, ‘आश्विनला खेळणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान आहे; पण आम्ही त्यासाठी योजना आखली आहे. आश्विनला आम्ही कसे खेळतो, यावरच या मालिकेचा निकाल अवलंबून राहील.’’मोहालीच्या खेळपट्टीबाबत ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘खेळपट्टी कोरडी भासत आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी आशा आहे. सध्या खेळपट्टी तशीच वाटत आहे.’’ ड्युप्लेसिसने मुंबईत खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या वन-डे सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्या भारतीय संघव्यवस्थापनावर नेम साधला.(वृत्तसंस्था) भारतीय संघाने विजय मिळविला असता तर तक्रार केली असती, असे वाटत नाही. या दौऱ्यात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मोहालीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाच्या यशात वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्कलची भूमिका महत्त्वाची ठरेल.- फाफ डू प्लेसिस