शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धा: महाराष्ट्राच्या नितीन म्हात्रेला सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 20:52 IST

नितीनच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे महाराष्ट्राने 11 व्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत आपले पहिले सुवर्ण पदक पटकावले.

ठळक मुद्दे महाराष्ट्राच्या होल्ड मॅन नितीन म्हात्रेने आपल्या अनुभवी, पीळदार आणि सहजगत्या पोझ मारण्याच्या कलेच्या जोरावर बाजी मारली.

मुंबई : कोणतीही पोझ मारताना एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्थिर राहणारा महाराष्ट्राचा होल्ड मॅन आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रेने 60 किलो वजनी गटात पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करीत आपल्या भारत श्री गटविजेतेपदाची हॅट्ट्रिक केली. नितीनच्या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राने 11 व्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत आपले पहिले सुवर्ण पदक पटकावले. तसेच 55, 65 आणि 70 किलो वजनी गटात रेल्वेच्या जे.जे.चकवर्ती, एस. भास्करन आणि अनास हुसेन यांनी बाजी मारून रेल्वेची सुवर्ण गाडी सुसाट असल्याचे दाखवून दिली. त्याचप्रमाणे 90 खेळाडूंचा सहभाग असलेल्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात महाराष्ट्राच्या किरण साठे आणि रोहन पाटणकरला धक्का देत चंदीगडच्या चेतन सैनीने धमाकेदार यश संपादले.

भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेच्या पहिल्या चार गटात रेल्वेने जबरदस्त कामगिरीची नोंद करीत महाराष्ट्राच्या सांघिक विजेतेपदाच्या स्वप्नांमध्ये अडथळे निर्माण केले आहे. 55 किलो वजनी गटात रेल्वेच्या जे.जे. चक्रवर्तीने दिल्लीच्या सोनूला मागे टाकत सोने जिंकले. त्यानंतर 60किलो वजनी गटातही रेल्वेच्याच हरीबाबूचा बोलबाला होता, पण महाराष्ट्राच्या होल्ड मॅन नितीन म्हात्रेने आपल्या अनुभवी, पीळदार आणि सहजगत्या पोझ मारण्याच्या कलेच्या जोरावर बाजी मारली. 65 किलो गटात अनिल गोचीकरला अनपेक्षित धक्का देत एस. भास्करनने रेल्वेला आणखी एक सुवर्ण जिंकून दिले. 70किलो वजनी गटातही रेल्वेच्या अनास हुसेनने करामात करून दाखविली. त्याने पंजाब पोलीसांच्या माजी मि. वर्ल्ड हिरालालला नमवत सुवर्णाला गवसणी घातली.

टॅग्स :Gold medalसुवर्ण पदकIndiaभारत