शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
5
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
6
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
7
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
8
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
9
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
10
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
11
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
12
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
13
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
14
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
15
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
16
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
17
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
18
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
19
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
20
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!

कोलकात्यानंतर गुजरातनेही केला बंगळुरुचा दारुण पराभव

By admin | Updated: April 28, 2017 02:16 IST

अँड्र्यू टाय आणि स्फोटक फलंदाज अ‍ॅरोन फिंच या आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या लाजवाब कामगिरीच्या बळावर गुजरात लायन्सने

ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. 27 - अँड्र्यू टाय आणि स्फोटक फलंदाज अ‍ॅरोन फिंच या आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या लाजवाब कामगिरीच्या बळावर गुजरात लायन्सने आज येथे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. या पराभवाबरोबरच विराट कोहली अँड कंपनीचे आयपीएल प्लेआॅफमध्ये पोहोचण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.

कोलकाता येथे चार दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये सर्वांत कमी ४९ धावांत गारद होणारा आरसीबीचा संघ आजच्याही लढतीत प्रारंभीच ढेपाळला आणि त्यातून ते अखेरपर्यंत सावरू शकले नाही. त्यांच्या फक्त चार फलंदाजांना दुहेरी आकडी धावा फटकावता आल्या. त्यात पवन नेगीने १९ चेंडूंत ३२, केदार जाधवने १८ चेंडूंत ३१ धावा केल्या. अखेर त्यांचा संघ २० षटकांत १३४ धावांत गारद झाला.त्यानंतर फिंचने अवघ्या ३४ चेंडूंतच ५ चौकार आणि ६ षटकारांसह ७२ धावांचा पाऊस पाडताना आरसीबीच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. कर्णधार सुरेश रैना ३० चेंडूत ३४ धावांवर नाबाद राहिला. अशा प्रकारे लायन्सने अवघ्या १३.५ षटकांत ३ बाद १३५ धावा करीत ३७ चेंडू बाकी ठेवताना दणकेबाज विजयाची नोंद केली. आरसीबीचा हा ९ सामन्यांतील सहावा पराभव आहे आणि त्यांचे फक्त ५ गुण आहेत. लायन्सने आठव्या सामन्यात तिसरा विजय मिळवला आणि आता ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.विजयाचा पाठलाग करताना गुजरातचीही सुरुवात खराब झाली आणि त्यांचे दोन्ही सलामीवीर इशान किशन (१६) आणि आयपीएलमध्ये १०० वा सामना खेळणारा ब्रँडन मॅक्युलम (३) यांना सॅम्युअल बद्रीने बाद केले. त्यानंतर फिंचने तडाखेबंद फलंदाजी करताना आरसीबीला डोके वर काढण्याची संधीच मिळू दिली नाही. फिंचने बद्रीला दोन षटकार मारत त्याचे विश्लेषण बिघडवले. त्यानंतर त्याने श्रीनाथ अरविंदला दोन चौकार व नंतर यजुवेंद्र चहलचे षटकाराने स्वागत केले. या आॅस्ट्रेलियन फलंदाजाने अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीवर २ चौकार व एका षटकारासह २२ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. गुजरात लायन्सकडून हे सर्वांत वेगवान अर्धशतक ठरले. बाद होण्यापूर्वी फिंचने ११ व्या षटकात नेगीला दोन षटकार ठोकले. फिंच परतल्यानंतर रैनाने नेगीला षटकार आणि ट्रेव्हिसला दोन चौकार ठोकत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फलंदाजांची ढिसाळ कामगिरी पुन्हा एकदा एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कायम राहिली. त्यामुळे गुजरातने गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर बँगलोरला २० षटकांत अवघ्या १३४ धावांत गारद केले.आॅस्ट्रेलियन गोलंदाज अँड्र्यू टाय पुन्हा एकदा प्रभावी ठरला. त्याने ४ षटकांत फक्त १२ धावा देत ३ गडी बाद केले. रवींद्र जडेजाने २८ धावांत २, तर जेम्स फॉकनर, बासील थम्पी आणि अंकित सोनी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर त्यांना प्रारंभीच जोरदार धक्के सहन करावे लागले. कर्णधार विराट कोहली (१०), स्फोटक ख्रिस गेल (८), संघात पुनरागमन करणारा ट्रेव्हिस हेड (०) हे धावफलकावर अवघ्या २२ धावा असताना तंबूत परतले.संक्षिप्त धावफलक आरसीबी : २० षटकांत १३४. (पवन नेगी ३२, केदार जाधव ३१, विराट कोहली १०. अँड्र्यू टाय ३/१२, रवींद्र जडेजा २/२८)गुजरात लायन्स : १३.५ षटकांत ३ बाद १३५. (अ‍ॅरोन फिंच नाबाद ७२, रैना नाबाद ३४, इशान किशन १६. सॅम्युअल बद्री २/२९, पवन नेगी १/२४).