नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) कोणत्याही पदांच्या शर्र्यतीत नसल्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी स्पष्ट करीत बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्र्यतीत नसल्याचेच सूचित केले. शशांक मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्या जागेसाठी शिर्के यांच्या नावाचीदेखील चर्चा होती. लंडनहून बोलताना शिर्के म्हणाले, बीसीसीआयमधील कोणतेही पद प्राप्त करण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. माध्यमांमध्ये माझे नाव येत आहे. काहींना वाटते की मीच जाणूनबुजून माझे नाव पुढे केले आहे. मात्र, तसे नाही. येत्या २२ तारखेला मुंबईत बीसीसीआयच्या बैठकीविषयी विचारले असता, त्या बैठकी विषयी कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मी लंडनमध्ये असून, मला बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीविषयी कोणतीही माहिती नाही. त्याबाबत जर बीसीसीआयकडून आमंत्रण आले असले, तर ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात असले. बीसीसीआयच्या कामकाजावर लोढा समितीच्या आदेशांचा प्रभाव कसा पडू शकतो हे सांगणे अवघड आहे. मात्र, मी बीसीसीआयचा कोषाध्यक्ष होतो. संस्थेची आर्थिक परिस्थिती मला ठाऊक आहे. जर जाहीरातींमध्ये कापातीचा निर्णय झाल्यास २वर्षांतच बीसीसीआयला नुकसान होईल, असे शिर्के म्हणाले. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनीदेखील जाहिरातकपातीचा निर्णय झाल्यास संस्थेला नुकसान होऊ शकते, असे सांगितले.
बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही : शिर्के
By admin | Updated: May 15, 2016 04:27 IST