फलंदाजांनी कठोर मेहनत घ्यायला हवी : सचिन तेंडुलकर

By Admin | Published: May 29, 2015 01:44 AM2015-05-29T01:44:25+5:302015-05-29T01:44:25+5:30

फलंदाजांनी जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी सातत्यपूर्ण सराव केला पाहिजे असे मत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले.

Bats should take a lot of hard work: Sachin Tendulkar | फलंदाजांनी कठोर मेहनत घ्यायला हवी : सचिन तेंडुलकर

फलंदाजांनी कठोर मेहनत घ्यायला हवी : सचिन तेंडुलकर

googlenewsNext

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या फलंदाजांनी जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी सातत्यपूर्ण सराव केला पाहिजे असे मत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. आपण क्रिकेट खेळत असताना असेच करत होतो असेही त्याने यावेळी सांगितले.
सचिन तेंडूलकर म्हणाला, ‘जागतिक स्तरावरील गोलंदाज नेहमी काहीतरी नवीन प्रयोग करत असतात त्यामुळे फलंदाजांनी सातत्याने आपल्या फलंदाजीवर काम केले पाहिजे.’ लसिथ मलिंगाच्या यॉर्करचा सामना कसा करावा असे विचारले असता त्याने ‘बाल नही बॉल देखो’ असे हसत हसत सांगितले.
आपल्या दिल्लीतील आठवणी सांगताना तो म्हणाला, ‘कसोटी कर्णधार म्हणून मी येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळला होता.फिरोजशहा कोटलावरील तो सामना आम्ही जिंकला होता. तेंडूलकरने दिल्लीत आपल्या कारकिर्दीतील ३५ वे शतक झळकवून सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला होता. हे शतकही सचिनला चांगलेच आठवते. तो म्हणाला, ‘आम्ही २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळत होतो. चेन्नईतील कसोटी सामन्यानंतर दिल्ली कसोटीपुर्वी दुपारी झोपल्यावर मी कोटला मैदानावर शतक करत असल्याचे स्वप्न पडले आणि मी खरेच या मैदानावर ३५ वे शतक केले होते.
दिल्लीतील क्रीडा रसिकांचेही त्याने खूप कौतुक केले. दिल्लीतील हवामान सारखे बदलत असते. हिवाळ्यात कडक थंडी व उन्हाळ्यात कडक ऊन असतानाही येथील क्रिकेट रसिक मोठ्या प्रमानावर मैदानावर येतात. असेही त्याने यावेळी सांगितले.

Web Title: Bats should take a lot of hard work: Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.