शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अनुभवाच्या आधारे दिव्या देशमुखने मारली बाजी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 03:52 IST

आकाश कवेत घेण्याचे स्वप्न सर्वंच बघत असतात पण ते साकारण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. चिमुकले हात लांब केले तर आकाशही कवेत घेता येते याची प्रचिती नागपूरची सर्वांत लहान वयाची फिडे मास्टर(वंडरगर्ल) बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक कामगिरीने आली आहे.

नागपूर : आकाश कवेत घेण्याचे स्वप्न सर्वंच बघत असतात पण ते साकारण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. चिमुकले हात लांब केले तर आकाशही कवेत घेता येते याची प्रचिती नागपूरची सर्वांत लहान वयाची फिडे मास्टर(वंडरगर्ल) बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक कामगिरीने आली आहे.ब्राझीलच्या पोसोक डी काल्डास शहरात संपलेल्या विश्व कॅडेट बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये १२ वर्षांखालील गटात जेतेपदाला गवसणी घालणाºया या वंडरगर्लचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. याप्रसंगी विमानतळावर कुटुंबीय व चाहत्यांतर्फे पेढे भरवून जल्लोषात स्वागत करण्यात आले. चिमुकल्या हातात विश्वविजेतेपदाचा चषक उंचावताना दिव्याच्या चेहºयावर आनंद झळकत होताच आणि डोळ्यात भविष्यात अनेक विजेतेपदाला गवसणी घालण्याचा विश्वासही दिसत होता, पण नागपूरच्या बुद्धिबळ विश्वात मानाचा तुरा खोवणाºया या चिमुकल्या बुद्धिबळपटूच्या स्वागताप्रसंगीबुद्धिबळ संघटनेच्या पदाधिकाºयांची अनुपस्थिती मात्र मनाला चटकालावून गेली. कल्याण बारट व दीपक पात्रीकर या पदाधिकाºयांव्यतिरिक्त दिव्याच्या स्वागतासाठी संघटनेचे पदाधिकारी विमानतळावर फिरकले नसल्याने आश्चर्य वाटले. मुंबईहून आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावरच दिव्याचे स्वागत केले आणि शाबासकीही दिली. यावेळी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित होत्या.संत्रानगरीचा नावलौकिक वाढविणाºया या खेळाडू आम्हाला भूषणावह आहेत. सर्व खेळाडूंचा नागपूर महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्याचा मानस असल्याचे यावेळी महापौर जिचकार यांनी सांगितले.स्वागतानंतर ‘लोकमत’सोबत बोलताना दिव्या म्हणाली,‘‘यापूर्वी १० वर्षांखालील गटात विश्वविजेतेपदाचा मान मिळवला असल्यामुळे यावेळी माझ्यावर विशेष दडपण नव्हते. स्पर्धेसाठी तयारी उत्तम केली होती त्यामुळे यश मिळवण्याची आशा होती. मनोधैर्य उंचावलेले होते आणि सुरुवातही चांगली झाली, पण तिसºया फेरीत मात्र कामगिरीत सातत्य राखता आले नाही. चौथ्या फेरीपासून मात्र वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरले आणि अखेर विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यात यश मिळाले. यापूर्वीच्या स्पर्धेचा अनुभव उपयुक्त ठरला.’’स्पर्धेदरम्यान वडील डॉ. जितेंद्र देशमुख ब्राझीलला गेले होते. स्पर्धेतील अनुभव कथन करतानाते म्हणाले,‘यावेळी माझ्यावरविशेष दडपण नव्हते. दिव्याची कामगिरी सुरुवातीपासून चांगली झाली. या वयोगटात सुरुवातीला खेळाडूला पराभव स्वीकारावालागला तर मनोधैर्य उंचावण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, पण दिव्याच्या बाबतीत यावेळी मला त्याचीगरजच पडली नाही. त्यामुळे माझे काम सोपे झाले.’विश्व कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची दिव्याचीही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१४मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये झालेल्या स्पर्धेत दिव्याने १० वर्षांखालील गटात विश्वविजेतेपदाचा मान मिळवला होता.दिव्याचा विजेतेपदाचा प्रवास११ व्या फेरीची लढतबरोबरीत सोडवताना एकूण ९.५ गुणांसह जेतेपदावर शिक्कामोर्तबदुसºया फेरीत चमकदार कामगिरीसह संयुक्तपणेअव्वल स्थानतिसºया फेरीअखेर चौथ्यास्थानी घसरणचौथ्या फेरीत मोठी झेपघेताना दुसरे स्थानपाचव्या फेरीच्या लढतीतमहिला फिडे मास्टर फिगुएरो बेरनल ज्युलिया डेनिसचा पराभव करीत साडेचार गुणांसह केली स्थिती बळकटत्यानंतर नवव्या फेरीअखेरएकमेव आघाडी घेतली होती.उर्वरित दोन फेºयांमध्येआघाडी कायम ठेवत तिने विश्वविजेतेपद कायम राखले.अकराव्या फेरीत आपल्याच अव्वल मानांकित रक्षिता रवीविरुद्धच्या लढतीत संयम दाखविताना एकूण साडेनऊ गुणांसह जेतेपद पटकावले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस