ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. १८ : विराट कोहलीच्या धडकेबाज शतकाच्या जोरावर बंगळुरे पंजाब समोर १२१ धावांचे आव्हान ठेवले आहे. सामना सुरु होण्यापुर्वी पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यास विलंब झाला. त्यामुळे सामना प्रत्येकी १५ षटकाचा खेळवण्यात आला. बेंगळुरुने काहली-गेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर १५ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावांचा डोंगर अभा केला. गेल -कोहलीने ११ षटकात १४७ धावांची सलामी दिली. गेलने ३२ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ षटकार आणि ३ चौकार लगावले. कोहलीने आज शानदार फलंदाजी करताना ५० चेंडूत शतक झळकावले. या मोसमातील त्याचे हे चौथे शतक होय. ११३ धावांची खेली करताना कोहलीने १२ चौकार आणइ ८ षटकाराची बरसात केली. एबी ० धावावर बाद झाला. के राहूलने १६ धावांचे योगदान दिले.