शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग पुनिया, शरथ कमल, अजय ठाकूर, हरिका द्रोणावली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 04:01 IST

राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव; पहिल्या सत्रात ५४ व्यक्तींना केले सन्मानित

नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या नामवंत व्यक्तींना सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये क्रीडा क्षेत्रातून बजरंग पुनिया (कुस्ती), शरथ कमल (टेबल टेनिस), हरिका द्रोणावली (बुद्धिबळ) आणि अजय ठाकूर (कबड्डी) या खेळाडूंचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.सोमवारी राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे पहिले सत्र पार पडले. या वेळी, एकूण ५४ नामांकितांना सन्मानित करण्यात आले. तसेच उर्वरित ५८ व्यक्तींना १६ मार्च रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येईल. २५ जानेवारीला एकूण ११२ पद्म विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री, तिरंदाज बोम्बायलादेवी लैश्राम आणि बास्केटबॉलपटू प्रशांती सिंग यांचाही समावेश आहे.बजरंगची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबजरंगने राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याशिवाय त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. २०१३ साली बजरंगने पहिल्यांदा सर्वांचे लक्ष वेधताना दिल्लीत झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६० किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते. त्याच वर्षी त्याने बुडापेस्ट जागतिक कुस्ती स्पर्धेतही कांस्यपदकाची कमाई केली. यानंतर २०१४ साली राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंगने रौप्य कमाई केली. २०१८ साली त्याने आपल्या कामगिरीचा आलेख उंचवताना गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर कब्जा केला.टेबल टेनिसपटू शरथ कमलनेही २०१८चे वर्ष गाजवले. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने चार पदकांची कमाई केली. पुरुष सांघिक गटात त्याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, तर पुरुष दुहेरीत, पुरुष एकेरीत आणि मिश्र दुहेरीत रौप्य व कांस्यपदक जिंकले. भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार अजय ठाकूरलाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दुबईत कबड्डी मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. तसेच २०१६ साली झालेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक खेळ करताना अजयने भारताच्या जगज्जेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले होते.महिला ग्रँडमास्टर हरिका द्रोणावली हिलाही राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७ साली झालेल्या विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत हरिकाने कांस्यपदक जिंकले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेतील हे तिचे तिसरे कांस्य ठरले. याआधी २०१२ आणि २०१५ सालीही हरिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय गिर्यारोहक बाचेंद्री पालला पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.