शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

बबिता फोगाटची 'तबलिगी जमात' वर वादग्रस्त पोस्ट; महाराष्ट्रात पोलीस तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 11:51 IST

कोरोना व्हायरस देशात परसण्यामागे 'तबलिगी जमात' कारणीभूत आहे. त्यांच्या चुकीमुळे लॉकडाऊन वाढला, असं वादग्रस्त ट्विट भारताची कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगाटनं केलं होतं.

कोरोना व्हायरस देशात परसण्यामागे 'तबलिगी जमात' कारणीभूत आहे. त्यांच्या चुकीमुळे लॉकडाऊन वाढला, असं वादग्रस्त ट्विट भारताची कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगाटनं केलं होतं. तिच्या समर्थनात आणि विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू आहेत. पण, तिच्या या विधानानं समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगून बबिता विरोधान महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'तबलिगी जमात'शी संबंधित असलेल्या व्यक्तीनं औरंगाबाद शहर चौकातील पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली आहे.

''कोरोना वायरस भारत की दूसरे नंबर की सबसे बड़ी समस्या है। जाहिल जमाती अभी भी पहले नंबर पर बना हुआ है।#jahiljamati,'' असं ट्विट तिनं 15 एप्रिलला केलं होतं. त्यानंतर तिला धमकीचे फोन, मॅसेज येऊ लागले. त्याला उत्तर देताना बबितानं 'तबलिगी जमात'च्या लोकांचा चांगलाच समाचार घेतला. 

ती म्हणाली,''माझ्या पोस्टनंतर मला धमकी देणारे फोन, मॅसेज येत आहेत. त्यांनी मी सांगू इच्छिते की तुमच्या धमकीला घाबरणारी मी झायरा वसीम नाही. तुमच्या धमकीला मी घाबरणार नाही. देशासाठी मी नेहमी लढत आली आहे आणि यापुढेही लढणार. माझ्या ट्विटमध्ये मी काहीच चुकीचं म्हटलेलं नाही आणि त्या विधानावर मी कायम आहे. तुम्हाला मी विचारते की तबलिगी जमात वाल्यांनी कोरोना संक्रमणला पसरवलं नसतं, तर आतापर्यंत हिंदुस्थानातून कोरोना व्हायरस नष्ट झाला असता. काही लोकांना सत्य कडू लागतं, पण मी सत्य बोलणं सोडणार नाही.''

तिच्या या विधानाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ''बबिता फोगाटनं 2 आणि 15 एप्रिलला केलेल्या ट्विट विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिनं या पोस्टमधून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बबिता आणि कंगना रौनातची बहीण रंगोली चांडेल यांच्याविरोधात आयपीएस कलम 153A आणि  Information Technology Act नुसार तक्रार दाखल करण्यात यावी,'' अशी मागणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBabita Kumari Phogatबबिता फोगाट