शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाची दमदार मजल

By admin | Updated: December 28, 2015 03:32 IST

आघाडीच्या चार फलंदाजांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात दमदार मजल मारणाऱ्या आॅस्ट्रेलियाने रविवारी प्रत्युत्तरात खेळणाऱ्या वेस्ट इंडीज संघाची नाजूक अवस्था केली.

मेलबोर्न : आघाडीच्या चार फलंदाजांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात दमदार मजल मारणाऱ्या आॅस्ट्रेलियाने रविवारी प्रत्युत्तरात खेळणाऱ्या वेस्ट इंडीज संघाची नाजूक अवस्था केली. दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली.आॅस्ट्रेलियाने पहिला डाव ३ बाद ५५१ धावसंख्येवर घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडीजची ६ बाद ९१ अशी अवस्था झाली आहे. विंडीजला आॅस्ट्रेलियाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ४६० धावांची गरज असून, त्यांच्या चार विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला त्या वेळी डॅरेन ब्राव्हो (१२) आणि पदार्पणाची कसोटी खेळणारा कार्लोस ब्रेथवेट (३) खेळपट्टीवर होते. होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे ही लढतही एकतर्फी असल्याचे चित्र आहे. विंडीजच्या एकाही फलंदाजाला आॅस्ट्रेलियाच्या माऱ्याला समर्थपणे तोंड देता आले नाही. आॅस्ट्रेलियातर्फे पीटर सीडल (१९ धावांत २), नॅथन लियोन (१८ धावांत २) आणि जेम्स पॅटिन्सन (३६ धावांत २ ) यशस्वी गोलंदाज ठरले. त्याआधी, सकाळच्या सत्रात कालच्या ३ बाद ३४५ धावसंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलियातर्फे कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाबाद १३४ आणि अ‍ॅडम व्होजेसने नाबाद १०६ धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २२३ धावांची अभेद्य भागीदारी केली. व्होजेसने शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळाने स्मिथने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. स्मिथचे कारकिर्दीतील १३, तर या वर्षातील सहावे कसोटी शतक आहे. त्याने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण आठ शतके झळकावताना न्यूझीलंडच्या केन विलियम्सनच्या विक्रमाची बरोबरी केली. (वृत्तसंस्था)> स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाने विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी शतकी खेळी केली. ख्वाजाच्या शतकी खेळीसह आॅस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन प्रकारच्या क्रिकेटमध्ये एक हजार शतके ठोकण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा आॅस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे. शतके ठोकणाऱ्या संघांमध्ये इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या नावावर ९६४ शतकांची नोंद आहे. भारताने एकूण ६८८ शतके ठोकली असून, या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडीज संघ ६२९ शतकांसह चौथ्या, पाकिस्तान (५४३) पाचव्या स्थानावर आहे. ७७ शतकांसह बांगलादेश अखेरच्या १० व्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका संघ (५०१), श्रीलंका (३९३), न्यूझीलंड (३७७), झिम्बाब्वे (१०७) यांचा या यादीत समावेश आहे. >धा व फ ल कआॅस्ट्रेलिया ५५१/३ घोषित. वेस्ट इंडिज ९१/६आॅस्ट्रेलिया : स्टिव्ह स्मिथ नाबाद १३४ , अ‍ॅडम व्होजेस नाबाद १०६, गोलंदाजी : जेरोमी टेलर २/९७, क्रेग ब्रेथवेट १/७८.वेस्ट इंडिज : क्रेग ब्रेथवेट १७, राजेंद्र चंद्रिका २५, डॅरेन ब्राव्हो १३ खेळत आहे., जेरमन ब्लॅकवुड २८, कार्लोस ब्रेथवेट ३ खेळत आहे. गोलंदाजी : जेम्स पॅटिन्सन २/३६, नॅथन लायन २/१८, पीटर सिडल २/१९