शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाचा ८००वा कसोटी सामना

By admin | Updated: March 15, 2017 01:19 IST

आजपासून १४० वर्षांपूर्वी १५ मार्च १८८७ रोजी मेलबोर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटची सुरुवात करणारा आॅस्ट्रेलिया संघ या प्रवासात रांचीमध्ये एक नवा विक्रम नोंदवणार आहे.

नवी दिल्ली : आजपासून १४० वर्षांपूर्वी १५ मार्च १८८७ रोजी मेलबोर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटची सुरुवात करणारा आॅस्ट्रेलिया संघ या प्रवासात रांचीमध्ये एक नवा विक्रम नोंदवणार आहे. भारताविरुद्धचा तिसरा कसोटी सामना आॅस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील ८००वा कसोटी सामना ठरणार आहे. स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील संघ ही लढत संस्मरणीय ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहील. आॅस्ट्रेलिया ८०० कसोटी सामने खेळणारा जगातील दुसरा देश ठरणार आहे. इंग्लंडने यापूर्वी ही कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या नावावर ९८३ कसोटी सामन्यांची नोंद आहे. इंग्लंडने ८००वा कसोटी सामना ७ नोव्हेंबर २००२ रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये खेळला होता. त्या लढतीत त्यांना ३८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रांचीमध्ये प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन होत असून, हा एक ऐतिहासिक सामना ठरणार आहे. कारण आगामी एक दशकापेक्षा अधिक कालावधीत कुठला अन्य देश ८०० कसोटी सामने खेळण्याची शक्यता नाही. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडीज (५२०) संघाचा क्रमांक आहे. ८००च्या आकड्यापासून हा संघ बराच दूर आहे. भारतीय संघाचा विचार करता ५१० कसोटी सामने खेळणारा भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. त्यानंतर न्यूझीलंड (४२०), दक्षिण आफ्रिका (४०९), पाकिस्तान (४०७), श्रीलंका (२५७), झिम्बाब्वे (१०१), बांगलादेश (९९) आणि आयसीसी विश्व इलेव्हन (१) यांचा क्रमांक लागतो. आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत ७९९ कसोटी सामने खेळले असून, त्यांत ३७७ सामन्यांत विजय मिळविला, तर २१४ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. दोन सामने टाय झाले, तर उर्वरित २०६ सामने अनिर्णीत राहिले. सध्याच्या मालिकेदरम्यान आॅस्ट्रेलियन संघ भारतात कसोटी सामन्यांचे अर्धशतक पूर्ण करणार आहे. धरमशाला येथे होणारा चौथा कसोटी सामना भारतातील त्यांचा ५०वा कसोटी सामना असेल. आॅस्ट्रेलियाने सर्वाधिक ३४१ सामने इंग्लंडविरुद्ध खेळले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीज (११६), दक्षिण आफ्रिका (९४) आणि भारत (९२) यांचा क्रमांक लागतो. आॅस्ट्रेलियाने एक लढत आयसीसी विश्व इलेव्हन संघाविरुद्धही खेळली आहे. आॅस्ट्रेलियाने मायदेशात ४१०, तर विदेशात ३७९ आणि तटस्थ स्थळावर १० कसोटी सामने खेळले आहेत. आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत तीन दिवस-रात्र कसोटी सामने खेळलेले आहेत. आॅस्ट्रेलियाने मायदेशानंतर सर्वाधिक १७१ सामने इंग्लंडमध्ये खेळले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये प्रत्येकी ५० सामने खेळले आहेत. या महिनाअखेर भारताचा या यादीमध्ये समावेश होणार आहे. (वृत्तसंस्था) आॅस्ट्रेलियाने सर्वांत कमी सामने झिम्बाब्वेमध्ये (१ कसोटी) खेळले आहेत. ही लढत १९९९मध्ये खेळली गेली होती. रांची ठरणार भारताचे २६ वे कसोटी केंद्ररांची : महेंद्रसिंह धोनीने येथील स्टेडियमच्या उद््घाटनप्रसंगी डफ वाजविला होता. त्याची ही प्रतिमा येथील स्थानिक नागरिकांच्या हृदयात कायम आहे; पण चार वर्षांनंतर हे शहर भारताचे २६ वे कसोटी केंद्र म्हणून आपले नाव अधोरेखित करीत असताना येथील मूड मात्र निराशाजनक आहे. रांचीमध्ये गुरुवारपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारत व आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या शहरात हा पहिलाच कसोटी सामना आहे; पण शहराचा सर्वांत आवडता सुपुत्र दिल्लीमध्ये स्थानिक वन-डे संघाचे नेतृत्व करण्यात व्यस्त आहे.