शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन: नदालचा विश्वविक्रम एक सामना दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 07:41 IST

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

ठळक मुद्देया स्पर्धेआधी नदालला दुखापतींनी ग्रासले होते, तसेच कोरोना महामारीमुळे तो काहीकाळ खेळापासूनही दूर राहिला होता. त्यामुळे त्यालाही आपल्या कारकिर्दीतील वाटचालीविषयी शंका वाटत होती.

मेलबर्न : स्पेनचा दिग्गज टेनिसपटूराफेल नदाल विश्वविक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून केवळ एक सामना दूर आहे. त्याने इटलीचा लढवय्या खेळाडू मात्तेओ बेरेटीनी याचा कडवा प्रतिकार मोडून काढला. जेतेपदासाठी नदाल रशियाच्या डेनिस मेदवेदेवविरुद्ध भिडणार असून, मेदवेदेवने ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपास याला नमवले.उपांत्य सामन्यात नदालने चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात बेरेटीनीचे आव्हान ६-३, ६-२, ३-६, ६-३ असे परतवले. नदालला विजय मिळवण्यासाठी २ तास ५५ मिनिटांपर्यंत झुंजावे लागले. नदाल सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थानी असून, त्याच्यासह स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच यांनीही प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावली आहेत.

या स्पर्धेआधी नदालला दुखापतींनी ग्रासले होते, तसेच कोरोना महामारीमुळे तो काहीकाळ खेळापासूनही दूर राहिला होता. त्यामुळे त्यालाही आपल्या कारकिर्दीतील वाटचालीविषयी शंका वाटत होती. ऑस्ट्रेलियन ओपनच्या तयारीसाठी एका स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर नदालने ती स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर येथे सलग सहा सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. त्याचप्रमाणे, नदाल चारही ग्रँडस्लॅम जेतेपद किमान दोनवेळा पटकावणारा केवळ दुसराच खेळाडू ठरेल. दुसरीकडे, अन्य उपांत्य लढतीत अमेरिकन ओपन विजेता मेदवेदेवने अडीच तास रंगलेल्या सामन्यात सिटसिपासचे कडवे आव्हान ७-६ (७-५), ४-६, ६-४, ६-१ असे परतवले. गेल्या वर्षीही या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मेदवेदेवने सिटसिपासला नमवत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्याला जोकोविचविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.

टॅग्स :TennisटेनिसRafael Nadalराफेल नदाल