शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून; सिंधू, समीर यांच्याकडून दमदार कामगिरीची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 02:52 IST

सिंधूने सुरुवातीच्या फेरीत विजय मिळविल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ पडेल ती माजी ऑलिम्पिक चॅम्पियन ली शुरूईविरुद्ध.

सिडनी : भारतीय स्टार पी.व्ही. सिंधू हिच्याकडूल्लं मंगळवारपासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅटमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी अपेक्षित आहे. याशिवाय समीर वर्मा हादेखील विश्व टूर सुपर ३०० स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूने यंदा इंडिया ओपन तसेच सिंगापूर ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. पण जेतेपदापासून दूर राहिली. यंदा स्पेनची कॅरोलिना मारिन, कोरियाची सूंग जी ह्यून, चीनची बिगजिआओ आणि जपानची नोजोमी ओकुहारा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचे आव्हान परतवून लावण्यात सिंधूला सातत्याने अपयश येत आहे. मागच्या सत्रात याच खेळाडूंविरुद्ध सिंधूने विजय मिळविला होता, हे विशेष.

सिंधूने सुरुवातीच्या फेरीत विजय मिळविल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ पडेल ती माजी ऑलिम्पिक चॅम्पियन ली शुरूईविरुद्ध. उपांत्य फेरीसाठी सिंधूला ऑल इंग्लंड विजेती चेन यूफेईला नमवावे लागेल. जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावरील समीरला सुरुवातीला मलेशियाचा ली जी जिया याच्याविरुद्ध खेळावे लागेल.

बी. साईप्रणीत, एच. एस. प्रणॉय आणि पारूपल्ली कश्यप यांच्यावरही भारतीयांची मदार विशेष असेल. यावर्षी स्वीस ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या प्रणीतला पहिल्या फेरीत कोरियाचा ली डोंग कीऊन याचे, तर प्रणॉयला मलेशिया ओपनचा विजेता बलाढ्य लीन डॅनविरुद्ध खेळावे लागेल. कश्यपची सलामी थायलंडच्या खेळाडूविरुद्ध होईल.