शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Vivo Pro Kabaddi:नवव्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाची तारीख जाहीर; ५०० हून अधिक दिग्गज असणार रिंगणात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 13:32 IST

विवो प्रो कबड्डी लीग लवकरच आपल्या नवव्या हंगामात पदार्पण करणार आहे.

मुंबई: विवो प्रो कबड्डी लीगच्या (PKL) नवव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या लीगसाठी मुंबईत खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे यावर्षी तब्बल ५०० हून अधिक खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. नवव्या हंगामासाठी खेळाडूंचा होणारा लिलाव ५ ते ६ ऑगस्टदरम्यान मुंबईत पार पडेल. या लिलावात विदेशी खेळाडूंसह भारतातील युवा खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागले जाईल. ए, बी, सी, डी या श्रेणींमध्ये अष्टपैलू (Allrounder), बचावपटू (Defender) आणि चढाईपटू (Raider) यानुसार खेळाडूंना विभागले जाईल. 

दरम्यान, श्रेणी ए - ३० लाख, श्रेणी बी - २० लाख, श्रेणी सी - १० लाख आणि श्रेणी डी - ६ लाख या प्रत्येक श्रेणीसाठी किमती ठरवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नवव्या हंगामासाठी प्रत्येक फ्रँचायझीकडे एकूण ४.४ कोटी रूपये असणार आहेत. लीगमधील धोरणांनुसार प्रो कबड्डी लीगमधील संघाना त्यांच्या आठव्या हंगामातील खेळाडूंना कायम ठेवण्याचा पर्याय आहे. फ्रँचायझींना प्रत्येक PKL हंगामात ठरलेल्या अटींनुसार एलिट रिटेन्ड प्लेअर्स श्रेणी अंतर्गत ६ खेळाडू आणि ४ नवीन युवा खेळाडू कायम ठेवता येणार आहेत. कबड्डीची ही बहुचर्चित लीग लवकरच आपल्या नवव्या हंगामात पदार्पण करणार आहे. 

पाटणा पायरेट्सच्या संघाचे वर्चस्व प्रो कबड्डीच्या इतिहास सर्वाधिक ३ वेळा जेतेपद पटकावणारा पाटणा पायरेट्सचा एकमेव संघ आहे. संघाने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या हंगामात सलग तीन वेळा जेतेपद पटकावून विजयाची हॅट्रिक लगावली होती. मात्र गतवर्षी संघाला अंतिम फेरीत दबंग दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे लवकरच संघाचे मुख्य प्रशिक्षक आपल्या संघातील खेळाडूंची रिटेंशन लिस्ट जारी करण्याची शक्यता आहे. प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामाची सुरूवात ऑक्टोबर पासून होण्याची दाट शक्यता आहे. 

 

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबईPKL 2018प्रो कबड्डी लीग