शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

ऑलिम्पिकमध्ये सहभागासाठी प्रयत्नशील

By admin | Updated: November 23, 2014 02:20 IST

प्रत्येक खेळाडूची आपल्या देशाकडून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा असते.

 शिवाजी गोरे ल्ल पुणो

प्रत्येक खेळाडूची आपल्या देशाकडून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा असते. 2क्16 रियो ऑलिम्पिक स्पर्धेत  मला दुहेरीत खेळण्याची प्रबळ इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या माङो नियोजन आणि सराव सुरूअसल्याचे भारताचा अव्वल टेनिसपटू साकेत मायनेनीने ‘लोकमत’ला सांगितले. 
साकेत म्हणाला, की ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरीत सहभागी होण्यासाठी आपल्याला मानांकन 75 ते 1क्क् क्रमांकाच्या आत   असायला हवे तरच तुम्हाला त्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते. दुहेरीत माङो मानांकन 1क्क्च्या आत येण्यासाठी  आमचे सर्व प्रय} सुरूआहेत. त्यासाठी आवश्यक असलेला सरावसुद्धा ङिाशान अली सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ग्रण्डस्लॅम स्पर्धेत सहभागी होण्यासाठीसुद्धा आपले मानांकन एका विशिष्ट क्रमांकाच्या आत हवे. सध्या टेनिसमध्येसुद्धा खूप चुरस आहे. तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट ध्येय गाठायचे असेल, तर त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. सध्या माङो मार्गदर्शक ङिाशान अली सरांकडून योग्य मार्गदर्शन मिळत आहे. आमच्याकडे पूर्ण एक वर्ष आहे. त्या एका वर्षात कोणकोणत्या स्पर्धामध्ये सहभागी व्हायचे याची चर्चा आमच्यात सातत्याने सुरू असते. सरावाच्या वेळी माङयाकडून होत असलेल्या चुकांचा समाचार सराव संपल्यानंतर घेतला जातो. त्यात कशा सुधारणा करता येतील यावर चर्चा होते, सूचना दिल्या जातात. त्यामुळे 2016चे लक्ष्य समोर ठेवून तयारी सुरूआहे. मला व माङो मार्गदर्शक अलीसर  आम्हा दोघांनाही विश्वास आहे, की मी ते टार्गेट गाठेन. त्यासाठी मेहनत, शारीरिक क्षमता, ताकद, स्टॅमिना यावर अभ्यास सुरूआहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी विविध देशांतील स्पर्धामध्ये सहभागी होण्याचे नियोजनसुद्धा सुरू आहे. 
एटीपी टूरमध्ये इंदूर येथे विजेतेपद जिंकले होते, मग पुण्यात उपांत्यफेरीत पराभव पत्करावा लागला होता. याबाबत काय सांगशील? इंदूरमध्ये माझा खेळ सर्वोत्कृष्ट झाला होता. युईचीला मी पराभूत केले होते. 
पुण्यात माङयाविरुद्ध युईचीचा खेळ माङयापेक्षा चांगली झाला होता. खेळणा:या खेळाडूचा होता. खेळ होत नाही असे काही नसते. प्रतिस्पर्धी चांगला असला, की खेळात चुरस निर्माण होते. चांगला खेळाडू असला तर काही वेळेस आपल्याला पराभवाला समोरे जावे लागते. माझा खेळ पुण्यात चांगलाच  झाला होता, पण माङयापेक्षा त्याचा खेळ चांगला झाला होता म्हणून तो विजयी झाला.    भारतात झालेल्या एटीपी चॅलेंजर्स स्पर्धामुळे भारतीय खेळाडूंना परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव चांगला मिळेल. 
एटीपीमध्ये तर तुम्हाला तुमच्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे लागते, एक चूक जरी झाली तरी सेट गमवावा लागतो. तुम्ही जर दुहेरी खेळत असाल तर त्यासाठी तुमचा जोडीदारसुद्धा त्याच दर्जाचा हवा.  चॅम्पियन्स लीग टेनिसमुळेसुद्धा भारतातील टेनिसचा दर्जा उंचावेल. भारताचे काही खेळाडू या स्पर्धेत विविध संघांकडून खेळत आहेत. त्यांना चांगला अनुभव मिळेल. 
 
सानिया..शी इज ग्रेट 
आशियाई स्पर्धेत तिच्याबरोबर मिश्र दुहेरीत खेळताना वेगळेच वाटत होते. आत्मविश्वास  वाढत होता. ती सध्या आंतरराष्ट्रीयस्तरावर महिला दुहेरीतील नंबर एकची खेळाडू आहे. तिच्याबरोबर खेळताना जो अनुभव किंवा मार्गदर्शन मिळाले ते माङयासाठी खूप बहुमूल्य होते.  सामना सुरूअसताना तिचे खेळातील कौशल्य, आपल्या जोडीदाराचा आत्मविश्वास वाढविण्याची तिची पद्धत अफलातून आहे. आपण एवढय़ा मोठय़ा खेळाडू आहोत असे ती जाणवूही देत नाही. जर एखादी चूक झालीच तर तिची समजावून सांगण्याची पद्धतसुद्धा चांगली आहे. भविष्यात तिच्याबरोबर खेळण्याची संधी पुन्हा मिळाली तर ते मी माङो भाग्य समजेन.