शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Asian Wrestling Championships : महाराष्ट्राच्या राहुल आवारेची कांस्यपदकाची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 11:07 IST

Asian Wrestling Championships : भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवताना 20 पदकांची कमाई केली.

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवताना 20 पदकांची कमाई केली. भारतानं ग्रीको रोमन प्रकारात एक सुवर्ण आणि चार कांस्यपदक जिंकली. महिला गटात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकं, तर पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात एक सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकली. 

स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताला जितेंदरने 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून दिले. त्यानं कझाकिस्तानच्या कैसानोव्ह डॅनियारवर 3-1 असा विजय मिळवला.  2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि 2019च्या आशियाई व जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या राहुल आवारेनं 61 किलो वजनी गटात अटीतटीच्या लढतीत इराणच्या डॅस्टन माजीद आल्मासचे आव्हान 5-2 असे परतवून लावले आणि कांस्यपदक जिंकले. ''या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या निर्धाराने मी आलो होतो. त्यामुळे कांस्यपदक जिंकल्यानं निराश आहे,''अशी प्रतिक्रिया राहुलनं दिली. अखेरच्या दिवशी दीपक पुनियानं 86 किलो वजनी गटात इराकच्या अल ओबैदी इसा अब्दुलसलाम अब्दुलवाहाबवर 10-0 असा विजय मिळवून कांस्यपदक नावावर केले.

भारताचे पदक विजेते खेळाडू

  • ग्रीको रोमन - 

55 किलो - कांस्यपदक - अर्जुन हलाकुर्की 67 किलो - कांस्यपदक - आशू72 किलो - कांस्यपदक - आदित्य  कुंडू87 किलो - सुवर्णपदक - सुनील कुमार97 किलो - कांस्यपदक - हरदीप 

  • महिला गट

50 किलो - रौप्यपदक - निर्मला देवी53 किलो - कांस्यपदक - विनेश फोगाट55 किलो - सुवर्णपदक - पिंकी57 किलो - कांस्यपदक - अंशू 59 किलो - सुवर्णपदक - सरिता65 किलो - रौप्यपदक - साक्षी मलिक68 किलो - सुवर्णपदक - दिव्या काकरन72 किलो - कांस्यपदक - गुरशरन प्रीत कौर

  • पुरुष फ्री स्टाईल

57 किलो - सुवर्णपदक - रवी कुमार61 किलो - कांस्यपदक - राहुल आवारे65 किलो - रौप्यपदक - बजरंग पुनिया74 किलो - रौप्यपदक - जितेंदर79 किलो - रौप्यपदक - गौरव बलियान86 किलो - कांस्यपदक - दीपक पुनिया97 किलो - रौप्यपदक - सत्यवर्त कॅडीयन 

टॅग्स :Wrestlingकुस्तीRahul Awareराहुल आवारेMaharashtraमहाराष्ट्र