शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

भारताला 'सोनेरी' आनंद देणाऱ्या तेजिंदरला पितृशोक; त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 08:30 IST

आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदक दाखवून वडिलांकडून  पाठीवर कौतुकाची थाप मारून घेण्याचे तेजिंदरपाल सिंग तूरचे स्वप्न अधुरे राहिले.

मुंबई- आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदक दाखवून वडिलांकडून  पाठीवर कौतुकाची थाप मारून घेण्याचे तेजिंदरपाल सिंग तूरचे स्वप्न अधुरे राहिले. जकार्ता येथून मायदेशी परतल्यावर विमानतळावरच वडिलांच्या जाण्याची वार्ता त्याला मिळाली आणि सुवर्ण जिंकल्याचा आनंद क्षणात विरला. जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तेजिंदरने गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.  कँसरशी झगडणाऱ्या त्याच्या वडिलांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. (Asian Games 2018: वडिलांचा कँसरशी संघर्ष, मुलानं लिहिला सुवर्ण इतिहास!)

तेजिंदरने २०.७५ मीटर गोळाफेक करून आशियाई स्पर्धा विक्रमासह भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. मागील बरीच वर्ष तेजिंदरचे वडील करम सिंग यांचा घश्याच्या कँसरशी संघर्ष सुरू होता. त्यांना बोलताही येत नव्हते. त्यामुळे सुवर्णपदक जिंकल्याचे निरोप आईच्या माध्यमातून वडिलांना कळवला होता. मायदेशात परतल्यावर ते पदक घरच्यांना दाखवण्यासाठी तो आतुर होता, परंतु नियतीला ते मान्य नसावे. 

( Asian Games 2018 : गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक, तेजींदरपालचा विक्रम )

शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या तेजींदरने वडिलांखातर गोळाफेक खेळाची निवड केली.  आशियाई स्पर्धेचे सराव शिबीर पतियाळा येथे भरलेले होते. त्यावेळी तो सरावाचे वेळापत्रक सांभाळून लुधियानाला आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जायचा. काही काळ त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवरही झाला होता. मात्र, प्रशिक्षकांनी समजावल्यानंतर त्याने सरावावर लक्ष केंद्रित केले. तेजिंदरच्या वडिलांच्या जाण्याचा क्रीडा वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.  

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा