शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

आशियाई ‘जंग’ आजपासून

By admin | Updated: September 19, 2014 02:20 IST

17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेची उद्या, शुक्रवारी पिवळ्या समुद्राच्या काठावर वसलेल्या दक्षिण कोरियाच्या या शहरात दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरुवात होणार आहे.

45 देश, 13 हजार खेळाडू : चीनला आव्हान देण्यास यजमान दक्षिण कोरिया सज्ज
इंचियोन : ऑलिम्पिकपाठोपाठ जागतिक धर्तीवर दुसरा मोठा क्रीडा महाकुंभ मानल्या जाणा:या 17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेची उद्या, शुक्रवारी पिवळ्या समुद्राच्या काठावर वसलेल्या दक्षिण कोरियाच्या या शहरात दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरुवात होणार आहे. 16 दिवस रंगणा:या या महोत्सवात 45 देशांचे 13 हजारांवर खेळाडू दमखम दाखवीत पदकांसाठी चढाओढ करतील.
 1986 साली सेऊल आणि 2क्क्2 साली  बुसान आशियाडचे आयोजन करणारा  दक्षिण कोरिया यंदा तिस:यांदा आशियाडचे यजमानपद भूषवीत आहे. 4 ऑक्टोबर्पयत चालणा:या या स्पर्धेत 45 देशांचे खेळाडू 28 ऑलिम्पिक खेळांसह एकूण 36 क्रीडा प्रकारांतील 439 स्पर्धामध्ये पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील. आशियाड आयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जागतिक नकाशावर क्रीडा महाशक्ती बनलेला चीन पुन्हा एकदा स्वत:चे वर्चस्व टिकविण्याचे प्रय} करणार आहे. दुसरीकडे यजमान दक्षिण कोरिया आणि आशियातील माजी महाशक्ती असलेला जपान  चीनच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी सज्ज आहे.
चीनने 2क्1क् साली आपल्याच यजमानपदाखाली ग्वांगझू येथे झालेल्या आशियाडमध्ये 199 सुवर्णासह एकूण 416 पदके जिंकली होती. दक्षिण कोरियाने 76 सुवर्णासह 232, तर जपानने 48 सुवर्णासह 216 पदकांची कमाई केली. चीनपाठोपाठ  भारताला 14 सुवर्णासह 65 पदकांची कमाई झाल्याने भारत सहाव्या स्थानावर होता.
चीनने या स्पर्धेत सर्वाधिक 894, द. कोरियाने 833, जपानने 718 तर भारताने 679, थायलंड 518, हाँगकाँग 476, चायनीज तायपेई 42क्, कझाकिस्तान 415, उझबेकिस्तान 291, इराण 282, मलेशिया 277, कुवैत 258, कतार 251, मंगोलिया 234, आणि सिंगापूरने 23क् खेळाडूंचे पथक स्पर्धेत उतरविले आहे. भारताचा शेजारी पाकिस्तानने 188, नेपाळ 2क्4, मॅनमार 64, नेपाळ 136, श्रीलंका 8क् आणि भूतानने केवळ 16 खेळाडूंचे पथक स्पर्धेत पाठविले. सर्वात लहान पथक ब्रूनोईचे असेल. या पथकात 11 खेळाडू आहेत. उत्तर कोरिया 15क् खेळाडूंसह भाग घेईल. आशियाडची मशाल 9 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथे प्रज्वलित करण्यात आली होती. इंचियोन स्पर्धेच्या रिले दौडीने 7क् देशांमधील 57क्क् किमी अंतर पूर्ण केले. या स्पर्धेचे अधिकृत घोषवाक्य ‘विविधतेची चमक’ असे आहे. (वृत्तसंस्था)
 
चीनला आव्हान कोरिया, जपानचे !
दक्षिण कोरियाच्या सेऊल शहरात पहिल्यांदा आशियाडचे आयोजन झाले तेव्हा चीनने यजमान देशाला एकमेव सुवर्णाने मागे टाकून जेतेपदाचा मान मिळविला होता. चीनला त्यावेळी 94 सुवर्णासह 222 तर कोरियाला 93 सुवर्णासह 224 पदके मिळाली होती. त्याआधी नवी दिल्ली आशियाडमध्ये 1982 साली चीनने 61 सुवर्णासह सर्वाधिक 153 पदके जिंकण्याची कामगिरी केली. तेव्हापासून पदक तालिकेत सतत वर्चस्व गाजविणा:या चीनला नवव्यांदा पदक तालिकेवर ताबा मिळवायचा आहे. चीनला आव्हान असेल ते यजमान दक्षिण कोरियाचे. यजमान संघाने शंभर सुवर्णाचा आकडा गाठल्यास चीनच्या पायांखालील वाळू सरकू शकते. 
 
‘क्रीडाग्राम’मध्ये तिरंगा फडकला
आशियाई स्पर्धेच्या ‘क्रीडाग्राम’मध्ये गुरुवारी भारतीय पथकाचे प्रमुख एडिले सुमारीवाला यांच्या उपस्थितीत तिरंगा फडकविण्यात आला. शुक्रवारी मुख्य स्टेडियममध्ये आशियाई स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे. ध्वजारोहण समारंभाला माजी धावपटू सुमारीवाला, आयओएचे उपाध्यक्ष तरलोचन सिंग व महिला हॉकी संघांसह 5क् पेक्षा अधिक खेळाडू उपस्थित होते. भारतीय ध्वजासह अन्य पाच म्यानमार, उझबेकिस्तान, ताजिकीस्तान, चिनी तैपेई व पॅलेस्टाईन या देशांचे ध्वजही क्रीडाग्राममध्ये फडकविण्यात आले. 
 
उद्घाटन सोहळ्यात डिजिटल तंत्रची झलक
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्या, शुक्रवारी होणा:या भव्य आणि दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात डिजिटल तंत्रची झलक पेश होणार आहे. या डिजिटल तंत्रद्वारे यजमान देशाचा इतिहास आणि भविष्यात करण्यात येणा:या प्रगतीचे सादरीकरण करण्यात येईल. कोरियाने प्रगतीत घेतलेली ङोप तसेच जागतिक स्तरावर निर्माण केलेली ओळख याचे समग्र दर्शन अख्या जगाला घडविण्याचा मानस असल्याचे स्पर्धेचे संयुक्त संचालक इम क्वोन तेईक यांनी सांगितले. ‘ साडेचार अब्ज लोकांचे स्वप्न.. एक आशिया..!’ हे थीम साँग आहे. गंगनम स्टाईल नृत्याद्वारे लोकप्रिय झालेले पीएसवाय तसेच पियानो वाजविणारे लँग लँग हे 62 हजार उपस्थितांपुढे कलेचा नजराणा पेश करतील.
 
उत्तर कोरियाई खेळाडूंचे गंगनम स्टाईल स्वागत 
आशियाई स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दक्षिण कोरियाला पोहोचलेल्या उत्तर कोरियाच्या अधिकारी आणि खेळाडूंचे गंगनम स्टाईल स्वागत करण्यात आल़े सिंगापूर, चीन, थायलंड आणि यमनच्या संघांनी दक्षिण कोरियाई स्टार पीएसवायचे सुपरहिट गीत गंगनम स्टाईलवर नृत्य केल़े मात्र, उत्तर कोरियाई खेळाडूंनी गंगनम स्टाईल गीतवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही़
 
आशियाई स्पर्धेबद्दल निरुत्साह 
येथे उद्या, शुक्रवारपासून सुरू होणा:या आशियाई स्पर्धेबद्दल खेळाच्या यजमानपदाबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत नाही तसेच खेळाडू आणि प्रतिनिधींच्या स्वागतासाठी बॅनर आणि स्वयंसेवक नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आह़े विमानतळावर काही तुरळक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. येणा:या पाहुण्यांना येथे उद्या, शुक्रवारपासून आशियाई स्पर्धेचे आयोजन होणार आहे, असे वाटत नाही़  नागरिकांसाठी रोजच्याप्रमाणो उद्या, शुक्रवारचा दिवस असणार आह़े विशेष म्हणजे, विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर या स्पर्धेचे एकही बॅनर दिसत नाही़ यावरून या स्पर्धेबद्दल देशात विशेष उत्साह दिसून येत नाही़