शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई स्पर्धा; सुशील व साक्षी यांना निवड चाचणीत सहभागी न होण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 00:12 IST

आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार व साक्षी मलिक यांच्यासह चार मल्लांना पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतून माघार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने शुक्रवारी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देमहासंघाच्या मते या खेळाडूंनी वारंवार स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांच्या वजनगटात कुठले आव्हान मिळणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार व साक्षी मलिक यांच्यासह चार मल्लांना पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतून माघार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने शुक्रवारी या वृत्तास दुजोरा दिला आहे. महासंघाने सुशील, साक्षी, विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांना चाचणीत सहभागी न होण्याची परवानगी दिली आहे. तशी त्यांनी विनंती केली होती.याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी अधिकाºयाने सांगितले की, महासंघाच्या मते या खेळाडूंनी वारंवार स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांच्या वजनगटात कुठले आव्हान मिळणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.महासंघाच्या एका अधिकाºयाने सांगितले की,‘या मल्लांच्या तयारीमध्ये अडचण निर्माण होऊ नये, यासाठी डब्ल्यूएफआयने हा निर्णय घेतला. चाचणीत सहभागी न होण्याची त्यांची विनंती आम्ही मान्य केली. कारण ते आपापल्या वजन गटात सर्वोत्तम आहेत.’ अधिकारी पुढे म्हणाला,‘सुशीलने प्रशिक्षक विनोदच्या साथीने छत्रसाल स्टेडियममध्ये तयारी करण्याची विनंती केली होती. विनेश व साक्षी सध्या राष्ट्रीय शिबिरात आहेत तर बजरंग जॉर्जियामध्ये आपल्या खासगी प्रशिक्षकासोबत आहे.’ त्याचप्रमाणे, ‘आम्ही आपल्या प्रशिक्षकांसोबत चर्चा केल्यानंतर या खेळाडूंना चाचणीसाठी बोलविले तर त्यांच्या सरावामध्ये अडथळा निर्माण होईल आणि त्याचसोबत त्यांच्यावर अतिरिक्त दडपण येईल, अशी माहितीही अधिकाºयाने दिली. (वृत्तसंस्था)

सोनीपत, लखनौमध्ये चाचणीफ्रीस्टाईल व ग्रीको रोमनमध्ये चाचणी १० जून रोजी सोनीपतमध्ये होईल. येथेच सराव शिबिर सुरू आहे. महिला मल्लांचे सराव शिबिर लखनौमध्ये सुरू असून तेथेच चाचणी १७ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारSportsक्रीडा