शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games: नेमबाजीत भारताला आणखी एक पदक, सरबजोत सिंग आणि दिव्या टीएसने जिंकले रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 12:02 IST

Asian Games: चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट सुरू ठेवली आहे. या स्पर्धेतील नेमबाजीमध्ये भारताने आणखी एका पदकाची कमाई केली आहे.

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट सुरू ठेवली आहे. या स्पर्धेतील नेमबाजीमध्ये भारताने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. सरबजोत सिंग आणि दिव्या टीएस यांनी शनिवारी १० मीटर एअर पिस्तूल मिश्रित सांघिक गटामध्ये देशाला रौप्य पदक मिळवून दिले आहे. नेमबाजीच्या अंतिम फेरीमध्ये अटीतटीच्या लढतीत भारतीय नेमबाजांना चीनकडून १४-१६ असा पराभवाचा सामना करावा लागला.

अॅथलेटिक्समध्ये लांब उडीत  मुरली श्रीशंकर आणि जेसविन एल्ड्रिन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. श्रीशंकरने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ७.९७ मीटर लांब उडी मारत क्वालिफिकेशन मार्क पार केला. तर ज्योती याराजी नित्या रामराजने महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे. हॉकीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात संध्याकाळई ६.१५ वाजता लढत होणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत ८ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य अशी मिळून एकूण ३४ पदके जिंकली आहेत.  यामध्ये नेमबाजीमध्ये मिळालेल्या पदकांची संख्या लक्षणीय आहे. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Indiaभारत