शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Asian Games 2023 : गोल्डसोबत 'मन'ही जिंकलंस! नीरज चोप्राने तिरंगा खाली पडू नाही दिला अन्... Video Viral 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 18:39 IST

Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ८१ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली.

Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ८१ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. आज नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) भालाफेकीतील त्याचे जेतेपद कायम राखले. त्याने ८८.८८ मीटर लांब ( सर्वोत्तम कामगिरी) भालाफेकून सुवर्णपदक निश्चित केले. भारताच्या किशोर कुमार जेनाने ८७.५४ मीटरसह रौप्यपदकावर नाव कोरले. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारताने ३ मिनिटे २७.८५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले. त्यानंतर पुरुषांनी ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. रिले संघासोबत फोटो काढण्यासाठी नीरज जात असताना प्रेक्षकांमधून त्याच्याकडे कुणीतरी तिरंगा भिरकावला अन् त्याने तो खाली पडू नये यासाठी स्वतःला झोकून टाकले.

नीरज चोप्रासोबत चीनी आयोजकांचा चिटींग करण्याचा प्रयत्न, निराश झालेला भारतीय चॅम्पियन 

नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८५ मीटरच्या पार भाला फेकला. पण, आयोजकाच्या तांत्रिक चुकीमुळे त्याला पुन्हा प्रयत्न करावा लागला. त्यामुळे बराच गोंधळ उडाला आणि पुन्हा प्रयत्न करताना त्याने ८२.३८ मीटर लांब भालाफेकला, पंचांच्या गोंधळाचा त्याच्या कामगिरीवर नक्कीच फरक जाणवला. पण, नीरजने त्याच्या चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटर लांब भाला फेक करून अव्वल स्थान पटकावले. किशोरने ८७.५४ मीटर लांब भालाफेकून दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. भारताच्या दोन्ही भालाफेकपटूंनी सुवर्ण व रौप्यपदक नावावर केले. या सामन्यानंतर भारताच्या पुरुष रिले संघाने ४ बाय ४०० मीटर शर्यतीत ३ मिनिटे ०१.५८ सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक नावावर केले. नीरजला या रिले संघासोबत फोटो काढायचा होता आणि तो जातच होता. त्यावेळी प्रेक्षकांमधून कुणीतरी तिरंगा फेकला, परंतु खाली पडणारा तिरंगा नीरजने लगेच झेलला... 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Neeraj Chopraनीरज चोप्रा