शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : भारताचे कांस्य क्षणात झाले रौप्य! ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत तिसरे येऊनही झाला चमत्कार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 18:56 IST

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी करताना लांब उडीत रौप्यपदक जिंकून दिले.

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी करताना लांब उडीत रौप्यपदक जिंकून दिले. अॅन्सीने तिसऱ्या प्रयत्नात ६.५६ मीटर लांब उडी मारली आणि रौप्यपदकासाठी ती पुरेशी ठरली. त्याचवेळी मैदानी स्पर्धेत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले शर्यतीत भारताने ३ मिनिटे १४.४३ सेकंदाच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह तिसरे स्थान पटकावले अन् श्रीलंका दुसऱ्या व बहरिन ( ३:१४.०२ )  अव्वल स्थानावर होते.

 

त्यामुळे सुरुवातीला भारताला कांस्यपदक विजेता म्हणून जाहीर केले गेले. अंतिम रेषा पार करताना भारतीय व श्रीलंकन खेळाडू यांच्यात थोडेसेच अंतर राहिले होते. श्रीलंकेच्या खेळाडूकडून त्याचवेळी चूक झाली आणि तिने दुसऱ्या लेनमध्ये पाय टाकला. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला अपात्र ठरवण्यात आले आणि भारताला रौप्यपदक विजेता जाहीर केले गेले. चौथ्या स्थानावर असलेल्या कझाकिस्तानच्या संघाला कांस्यपदक मिळाले. 

  • अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने रौप्य आणि प्रिती लांबाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारूलने ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आज नोंदवली, तर प्रिती ९ मिनिटे ४३.३२ सेकंदासह तिसरी आली. प्रितीनेही सर्वोत्तम वेळेची नोंद आज केली. 
  •  कबड्डी - २०१० व २०१४च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला अ गटातील पहिल्याच लढतीत चायनीस तैपेईकडून बरोबरीवर समाधानी राहावे लागले. शेवटच्या ७ सेकंदात तैपेईने अखेरच्या चढाईत गुण घेत हा सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवला.
  • हॉकी - भारताच्या पुरुष संघाने अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशला १२-० असे नमवले. हरमनप्रीत सिंग ( ३),  मनदीप सिंग ( ३), अभिषेक ( २), रोहिदास, उपाध्याय, गुरजंत सिंग आणि एन शर्मा यांनी प्रत्येकी १ गोल केला.
  • टेबल टेनिस - भारताच्या सुतिर्था व अहिका मुखर्जी या बहिणींनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताला ऐतिहासिक पदक जिंकून दिले. मुखर्जी बहिणींनी महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेतील दुहेरी विभागाचे कांस्यपदक पटकावले. 
टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघSri Lankaश्रीलंका