Asian Games 2023, Hockey : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये Shooting 10m Air Rifle Mixed Team नेमबाजीत दिव्यांक्ष सिंग आणि रमिता यांना मिश्र सांघिक गटाचे कांस्यपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली.
१० मीटर एअर रायफल मिश्र गटात पहिल्या राऊंडमध्ये भारतीय जोडीने जबरदस्त पुनरागमन केले आणि कांस्यपदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले होते. कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय नेमबाजांनी चांगली सुरूवात करताना दक्षिण कोरियाच्या हाजून पार्क व इयून्सेओ ली या जोडीवर पहिल्या फेरीत ६-० अशी आघाडी मिळवली. पण, कोरियन खेळाडूंनी मॅच ९-९ अशी बरोबरीत आणली. मात्र, भारतीय जोडी हार मानणारी नव्हती आणि त्यांनी चांगली टक्कर दिली. शेवटच्या राऊंडपर्यंत कोरियाने १५-१५ अशी बरोबरी मिळवली. त्यानंतर १७-१७ व १८-१८ अशी बरोबरी झाली अन् पुन्हा दोन्ही संघांमध्ये एका राऊंडची मॅच झाली. यावेळी कोरियन खेळाडूंचा अनुभव कामी आला अन् त्यांनी २०-१८ अशी बाजी मारून कांस्यपदक नावावर केले.