शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : शेतकऱ्याच्या लेकीनं लिहिला 'सुवर्ण' इतिहास! पारुल चौधरीनं काल रौप्य अन् आज जिंकलं गोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 17:51 IST

Asian Games 2023 : भारताच्या पारुल चौधरीने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आज ५००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले.

Asian Games 2023 : भारताच्या पारुल चौधरीने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आज ५००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. पारुलने काल ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि आज तिने सुवर्ण इतिहास लिहिला. पारुलने  शेवटच्या ३० मीटरमध्ये जबरदस्त पुनरागमन करताना १५ मिनिटे १४. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक नावावर केले.  अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने रौप्य आणि प्रिती लांबाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारूलने ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आज नोंदवली, तर प्रिती ९ मिनिटे ४३.३२ सेकंदासह तिसरी आली. प्रितीनेही सर्वोत्तम वेळेची नोंद केली होती. मेरठची चॅम्पियन मुलगी पारुल चौधरीची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. पारुल चौधरी ही शेतकऱ्याची मुलगी एकेकाळी तिच्या गावातून स्टेडियमपर्यंत पायी जात असे. ८ वर्षांपूर्वी पारुलने जो ध्यास विकसित केला होता त्यामुळेच आज ती देशातील प्रथम क्रमांकाची धावपटू बनली आहे. या चॅम्पियन मुलीने आतापर्यंत इतकी पदके जिंकली आहेत की संपूर्ण खोली पदकांनी भरून गेली आहे.  

पीटी उषाचा ३९ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडणाऱ्या विथ्या रामराजने ४०० मीटर हर्डलमध्ये आज ५५.६८ सेकंदाची वेळ नोंदवरून कांस्यपद नावावर केले. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Indiaभारत