शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक तीर, दो निशान! कोल्हापूरच्या तुषारसह भारतीय संघाने इतिहास रचला, ऑलिम्पिकचे तिकिटही पटकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 14:19 IST

Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ गाजवलेली पाहायला मिळतेय... भारताने आतापर्यंत २१ सुवर्ण, ३३ रौप्य व ३६ कांस्य अशा एकूण ९० पदकांसह तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीय.

Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ गाजवलेली पाहायला मिळतेय... भारताने आतापर्यंत २१ सुवर्ण, ३३ रौप्य व ३६ कांस्य अशा एकूण ९० पदकांसह तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीय. भारताची ही आशियाई स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे आणि यंदा भारतीय खेळाडूंनी शंभरी पार असे लक्ष्य ठेवले आहे. त्यात सेपाकतक्राव या खेळात भारतीय महिला संघाने भारताला ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून दिले. तिरंदाजीत आज अतून दास, तुषार शेळके आणि धिरज बोम्मादेवारा यांनी इतिहास घडवला. पुरुषांच्या रिकर्व्ह गटाच्या फायनलमध्ये प्रवेश करणारा हा पहिला संघ ठरला. 

महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात जन्मलेला आणि लहानाचा मोठा झालेला तुषार एका उद्योगपती कुटुंबातून आला आहे. त्याचे आजोबा स्वर्गीय महादेव राव शेळके (महादबा मेस्त्री) यांच्यापासून ते उद्योगात अग्रेसर आहेत, जे स्वदेशी कोळसा वायू प्रकल्प विकसित करणारे पहिले भारतीय होते. दक्षिण कोरियाविरुद्धच्या फायलनमध्ये भारताने कडवी टक्कर दिली. दक्षिण कोरियाने पहिल्या सेटमध्ये परफेक्ट १० शॉट्समारून २-० अशी आघाडी घेतली. पण, दुसऱ्या सेटमध्ये भारताने १ गुण घेतला, परंतु दोन्ही संघांमध्ये ५७-५७ अशी बरोबरी झाल्याने सेटचा निकाल ३-१ असा कोरियाच्या बाजूनेच होता. तिसऱ्या सेटमध्ये कोरियाने २ गुण घेतले आणि सुवर्णपदक नावावर केले. दक्षिण कोरियाने ५-१ अशी बाजी मारली. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीत भारताने ५-३ अशा फरकाने बांगलादेशला पराभूत केले. 

   

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३kolhapurकोल्हापूर