शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

Asian Games 2023 : ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात जे कुणालाच नाही जमले ते अनू राणीने करून दाखवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 18:54 IST

Asian Games 2023 : आज भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अनू राणीने ( Annu Rani) महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले.

Asian Games 2023 : भारताच्या पारुल चौधरीने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आज ५००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. पारुलने काल ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि आज तिने सुवर्ण इतिहास लिहिला. पारुलने  शेवटच्या ३० मीटरमध्ये जबरदस्त पुनरागमन करताना १५ मिनिटे १४. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक नावावर केले. आज भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अनू राणीने ( Annu Rani) महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या अनूने आज इतिहास लिहिला. ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात भालाफेकीत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अनूने ६२.९२ मीटर लांब भालाफेकला.  अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने रौप्य आणि प्रिती लांबाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारूलने ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. मंगळवारी पीटी उषाचा ३९ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडणाऱ्या विथ्या रामराजने ४०० मीटर हर्डलमध्ये आज ५५.६८ सेकंदाची वेळ नोंदवरून कांस्यपद नावावर केले.  त्यानंतर पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत मोहम्मद अफसलने १ मिनिट ४८.४३ सेकंदच्या वेळेसोबत रौप्यपदक जिंकले. तिहेरी उडीत प्रविणने कांस्यपदक, बॉक्सिंगमध्ये ९२ किलो वजनी गटात नरेंदर बरवालने कांस्यपदक जिंकले. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघ