शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

Asian Games 2018: पदक विजेत्या खेळाडूंना इकोनॉमी, तर अधिकाऱ्यांना बिझनेस क्लासने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 09:22 IST

Asian Games 2018:18व्या आशियाई स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई केली. आत्तापर्यंतच्या आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि खेळाडूंनी अनेक विक्रमही मोडले.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः 18व्या आशियाई स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई केली. आत्तापर्यंतच्या आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि खेळाडूंनी अनेक विक्रमही मोडले. या स्पर्धेतील अनेक खेळाडू हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इथवर पोहोचले आहेत. त्यांच्या पदकाचे त्या दिवसापुरते तोंडभरून कौतुकही झाले. भारतीय पथकासोबत गेलेल्या अधिकाऱ्यांनी खेळाडूंसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर चमकुगिरीही केली. पण, मायदेशी परतत असताना या पदक विजेत्या खेळाडूंना नेहमीचा अनुभव आला. खेळाडूंना इकोनॉमी क्लासमधून प्रवास करावा लागला, तर अधिकाऱ्यांनी बिझनेस क्लासमधून प्रवास केला. भारतीय पथकाचे उपप्रमुख आर के सचेती यांनी मायदेशी परतताना बिझनेस क्लासमधून प्रवास केला आणि त्याच वेळी खेळाडू मात्र इकोनॉमी क्लासमध्ये होते. ''आमच्यामुळे ते इथे आहेत. त्याशिवाय त्यांना येण्याचा दुसरा पर्याय नाही. इकोनॉमी क्लासमधून प्रवास करण्यात काहीच त्रास नाही, परंतु अधिकाऱ्यांना अशी विशेष वागणुक मिळणार असेल, तर ती आम्हालाही मिळायला हवी,''असे मत व्हॉलिबॉल संघाच्या एका खेळाडूने व्यक्त केले. भारतीय व्हॉलिबॉलल संघाने जकार्ता ते सिंगापूर प्रवास SQ 967 या विमानाने केला. 

हा प्रवास मी स्वखर्चाने केला असल्याचे सांगत सचेती यांनी आपला बचाव केला. '' माझेही इकोनॉमी क्लासचे तिकीट होते, परंतु मी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून बिझनेस क्लासचे तिकीट घेतले,'' असे सचेती यांनी सांगितले. केंद्रिय क्रीडा मंत्रालयानेही सचेती यांच्या वर्तनाचा निषेध केला. मात्र, भारतीय ऑलिम्पिक असोसिएथनने सचेती स्वखर्चाने गेल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा