शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: बिनधास्त खेळ, निकालाची चिंता करू नकोस; अमितने वडिलांचा सल्ला ऐकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:32 IST

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या 14व्या दिवशी भारताला बॉक्सर अमित पांघलकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता झाली. अमितने 49 किलो वजनी गटाच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव केला.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः आशियाई स्पर्धेच्या 14व्या दिवशी भारताला बॉक्सर अमित पांघलकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता झाली. अमितने 49 किलो वजनी गटाच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव केला. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताचे बॉक्सिंगमधील हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.  आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा फारसा अनुभव पाठिशी नसतानाही अमितने वडिलांनी सांगितलेला सल्ला ध्यानात ठेवला. त्याच जोरावर त्याने अत्यंत चुरशीच्या सामन्यात 3-2 असा विजय मिळवला. सुवर्णपदक स्वीकारल्यानंतर राष्ट्रगीताच्या वेळी अमितचे डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते आणि ते चित्र पाहताना देशवासीहीयही भावूक झाले.'' पदकाचा अधिक विचार करू नकोस... प्रत्येक सामन्याचा बिनधास्त सामना कर, वडिलांच्या या सल्ल्यामुळेच मी यशस्वी ठरलो,'' असे मत अमितने व्यक्त केले. हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील छोट्याश्या गावातील अमितने 2009 पासून बॉक्सिंग शिकायला सुरूवात केली. मोठ्या भावाच्या हट्टाखातर तो या रिंगमध्ये उतरला आणि आज 9 वर्षांनी त्याने आज इतिहास घडवला. यशाचे हे शिखर सर करताना वडील विजेंदर सिंग यांचा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या अमितची आत्तापर्यंतची कामगिरी बरीच बोलकी आहे. 2009 मध्ये त्याने सब ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट सुरूच ठेवली होती. 2017चे ग्रँड प्रिक्स स्पर्धेतील सुवर्ण त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले. 2018 मध्ये त्याने इंडियन ओपन व स्ट्रॅड्जा मेमोरियल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि केमिस्ट्री चषक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाboxingबॉक्सिंग