शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण' भेद पुन्हा हुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 15:49 IST

Asian Games 2018: \भारतीय नेमबाजांनी आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन रौप्यपदक जिंकून दिले.

जकार्ता - भारतीय नेमबाजांनी आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन रौप्यपदक जिंकून दिले. सकाळच्या सत्रात दीपक कुमारने 10 मीटर एअर रायफल प्रकारात, तर 19 वर्षीय लक्ष्य शेओरन याने पुरूषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्याने दोघांनाही 'सुवर्ण' भेद करता आला नाही. अगदी थोडक्यात त्यांचे सुवर्णपदक हुकले.

10 मीटर एअर रायफल प्रकारत दीपकने पात्रता फेरीतील सुमार कामगिरीनंतर अंतिम फेरीत जोरदार कमबॅक केले. त्याने 247.7 गुणांसह रौप्यपदकावर कब्जा केला. सुवर्णपदकाच्या शर्यतीत त्याने चीनच्या यांग हाओरानला कडवी झुंज दिली. चीनी खेळाडूने 249.1 गुणांच्या आशियाई स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. चायनीज तैपेईच्या लू शाओचूनने ( 226.8) कांस्यपदक जिंकले. भारताच्या रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरूषांच्या ट्रॅप प्रकारात लक्ष्य आणि अनुभवी मानवजीत सिंग संधू यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 30व्या फेरीपर्यंत मानवजीत आणि लक्ष्य यांनी अव्वल तिघांमध्ये स्थान कायम राखले होते, मात्र, पुढील पाच प्रयत्नांत मानवजीतचे तीन प्रयत्न हुकले आणि तो पदकशर्यतीतून बाद झाला. त्यामुळे लक्ष्यवर सर्व जबाबदारी आली. त्यानेही सुवर्णपदकाच्या शर्यतीत झेप घेतली. 

त्याच्यासमोर चायनीज तैपेईच्या यांग कुनपीचे आव्हान होते. लक्ष्यने अखेरच्या 15 प्रयत्नांत केवळ एकदाच अपयश आले आणि तेच त्याला महागात पडले. कुनपीचे 50 पैकी दोन नेम चुकले आणि त्याने विश्वविक्रमाची बरोबरी केली. कुनपीने 48 गुणांची कमाई केली आणि 2017 मध्ये स्पेनच्या अलबर्टो फर्नांडेझने विश्वविक्रम नोंदवला होता.

दरम्यान महिलांच्या ट्रॅप प्रकारात सीमा तोमरला अंतिम फेरीत सहाव्या स्थानावरच समाधान मानावे लागले. तिने 25 पैकी 12 गुणच कमावले.  

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाShootingगोळीबारSportsक्रीडा