शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: गोपीचंद सर नसते तर... द्युतीच्या यशामागे मोठं योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 10:02 IST

Asian Games 2018: चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करताना द्युती चंदने आशियाई स्पर्धेत भारताला महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले.

जकार्ता - चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करताना द्युती चंदने आशियाई स्पर्धेत भारताला महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले. 2014मध्ये द्युतीला प्रतिबंधक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी चार वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. मात्र. त्याविरोधात तीने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आणि तिचा विजय झाला. मात्र, बंदीच्या काळात द्युतीला कोणीही आधार दिला नाही. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या द्युतीच्या मदतीला बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद पुढे आले. त्यांनी तिला नैराश्यातून बाहेर काढले आणि त्यांच्या हैदराबाद येथील अकादमीत राहण्यास सांगितले. द्युतीने ज्यावेळी आशियाई रौप्यपदक जिंकले तेव्हा गोपीचंद यांच्या आनंदासमोर गगन ठेंगणे वाटत होते. गोपीचंद म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. द्युतीने करून दाखवले. ती माझ्यासह सर्व खेळाडूंची प्रेरणास्थान आहे. तिच्या जिद्दीला आणि दृढनिश्चयाला सलाम. कठीण प्रसंगाशी दोन हात करणाऱ्या प्रत्येक खेळाडूची ती रोल मॉडल आहे. 

द्युतीने 20 वर्षांनंतर भारताला आशियाई स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत पदक जिंकून दिले आहे. यापूर्वी 1998 साली रचिता मिस्त्रीने कांस्यपदक जिंकले होते.  22 वर्षीय द्युतीचे हे पहिलेच आशियाई पदक आहे. ती म्हणाली, 2014 चे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात खराब वर्ष होते. लोकं माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा करत होते. आज त्याच मुलीने कमबॅक करताना देशाला पदक जिंकून दिले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा