शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: भारतीय पुरुष तिरंदाजांना सुवर्णपदकाची हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 13:03 IST

Asian Games 2018: पुरुष कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम लढतीत भारताने रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत दक्षिण कोरियाने 229-229 अशा बरोबरीनंतर शुटआउटमध्ये बाजी मारली.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः पुरुष कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम लढतीत भारताने रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत दक्षिण कोरियाने 229-229 अशा बरोबरीनंतर शुटआउटमध्ये बाजी मारली. 2014च्या आशियाई स्पर्धेतही भारताने याच गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी कोरियाला पराभवाची चव चाखवली होती. रजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश असलेल्या या संघाने सुरूवातीपासूनच वर्चस्व गाजवले होते.

भारताने पहिला सेट 60-56 असा जिंकून चार गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. पहिल्या सेटमध्ये भारतीय खेळाडूने सहाही प्रयत्नांत दहापैकी दहा गुण घेतले. दुसऱ्या सेटमध्ये कोरियाकडून पलटवार झाला. त्यांनी हा सेट 57-54 असा जिंकून गुणांचे अंतर कमी केले आणि सामना 114-114 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये 58-56 अशी बाजी मारताना भारताने 172-170 अशी आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये पहिल्या तीन प्रयत्नांत कोरियाच्या खेळाडूंना 9, 9, 10 असे गुण मिळवता आले. त्याउलट भारताने 10, 9, 10 असे गुण घेत आघाडी आणखी भक्कम केली. अखेरच्या तीन प्रयत्नांत कोरिया खेळाडूंनी दोन परफेक्ट 10 नेम साधले. पण हा खेळ शुटआउटमध्ये गेला. त्यात भारताला हार पत्करावी लागली.

 

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाSportsक्रीडा