शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: आई-बाबांची शान, देशाचा अभिमान; व्हिडीओ कॉल करून 'तिनं' कुटुंबाला दाखवलं सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 13:44 IST

Asian Games 2018: भारतीय महिला रिले संघाने 4 बाय 400 मीटर शर्यतीत विक्रमी सलग पाचवे सुवर्णपदक पटकावले.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः  भारतीय महिला रिले संघाने 4 बाय 400 मीटर शर्यतीत विक्रमी सलग पाचवे सुवर्णपदक पटकावले. हिमा दास, एम आर पुवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया वेल्लूवा कोरोथ यांचा समावेश असलेल्या 4 बाय 400 मीटर रिले संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक नावावर केले. केरळच्या 21 वर्षीय विस्मयाचे आशियाई स्पर्धेतील हे पहिलेच पदक असल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला. हे पदक कधी एकदा आपल्या घरच्यांना दाखवते असे तिला झाले होते. तिने पदक वितरण सोहळ्यानंतर त्वरित आपल्या घरच्यांना व्हिडीओ कॉल केला. 

विस्मयाने नुसत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. त्याशिवाय राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धेचे रौप्यही तिच्या नावावर आहे. पण, विस्मयाला अॅथलेटिक्स बनण्यात कोणताही रस नव्हता.

बांधकाम मजुराची मुलगी असलेल्या विस्मयाने शिक्षणाला प्राधान्य दिले. तिने 12 वीतही A+ मार्क मिळवले आहेत आणि BSc Mathematics ची डिग्रीही घेतली आहे. आंतरशालेय आणि कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. पण, भविष्यात धावपटू होऊ असा विचार तिने कधीच केला नव्हता.

सोव्हियत युनियनची माजी धावपटू गॅलिना बुखारिना यांनी विस्मयावर विश्वास दाखवला. बुखारिना यांच्यामुळे विस्मया जकार्तात दाखल झाली.

आंतरराज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 53.30 अशी निराशाजनक कामगिरी करूनही बुखारिनाने तिला संघात स्थान सहभागी करून घेतले. बुखारिना यांनी दाखवलेल्या विश्वासाला विस्मयानेही तडा जाऊ दिला नाही. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा