शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

आशियाई चॅम्पियनशिपचा अनुभव राष्ट्रकुल स्पर्धेत कामी येईल- अलका तोमर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:29 AM

पीडब्ल्यूएलमधून मिळालेला आत्मविश्वास आणि आशियाई चॅम्पियनशिपच्या अनुभवाच्या जोरावर महिला पहिलवान पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत चांगला खेळ करतील,असे मत भारतीय महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षक अलका तोमर यांनी व्यक्त केले.

लखनौ : पीडब्ल्यूएलमधून मिळालेला आत्मविश्वास आणि आशियाई चॅम्पियनशिपच्या अनुभवाच्या जोरावर महिला पहिलवान पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत चांगला खेळ करतील,असे मत भारतीय महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षक अलका तोमर यांनी व्यक्त केले.तोमर यांनी सांगितल की,‘भारतीय पहिलवान आता जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत लढतील. त्यासाठी त्यांना मानसिक रूपाने तयार रहावे लागेल.’ त्या पुढे म्हणाल्या की,‘सर्व खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत पूर्ण तयारीने खेळतील. नुकत्याच झालेल्या पीडब्ल्यूएलने खेळाडूंच्या मनातून दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंबाबत वाटणारी भीती दूर झाली आहे.’तोमर पुढे म्हणाल्या की,‘पूजा ढांडाच्या या लीगमधील विक्रमाने अन्य भारतीय महिला पहिलवानांमध्ये आत्मविश्वास देखील निर्माण झाला आहे. त्यामुळेच आशियाई चॅम्पियनशिपमध्ये गेल्या काही दिवसात आमची महिला खेळाडू जपानी दिग्गज खेळाडूला पराभूत करण्यात यशस्वी ठरली.’विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणाºया पहिल्या भारतीय महिला खेळाडू असलेल्या अलका तोमर यांनी सांगितले की,‘ दिग्गज खेळाडूंसोबत सराव केल्याने त्यांचे तंत्र जाणून घेतल्याने तसेच त्यांचा सामना करण्याची मोठी संधी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना फायदा होत आहे. या तिन्ही बाबी पीडब्लूएलमुळे शक्य झाल्या.’आशियाई चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू नवज्योत कौर हिने सांगितले की,‘दिग्गज खेळाडूंसोबतच्या लढतीविषयी वाटणारी आमची भीती आता संपली आहे. आमचे पहिलवान आता मोकळेपणाने त्यांचा सामना करतात.’ (वृत्तसंस्था)>महिला, पुरुष संघ...भारतीय महिला पहिलवान सध्या लखनौमध्ये सराव करत आहेत. संघात विनेश (५० किलो), बबिता (५३ किलो), पूजा ढांडा (५७ किलो), साक्षी मलिक (६२ किलो), दिव्या काकरान (६८ किलो) आणि किरण (७६ किलो) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, पुरुषांच्या गटात राहुल आवारे (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), सुशील (७४ किलो), सोमवीर (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो) आणि सुमित (१२५ किलो) यांचा समावेश आहे.