शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

आशियाई बॉक्सिंग - मेरी कोम, सोनिया अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 4:14 AM

पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणारी एम. सी. मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पाचवे सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करताना मंगळवारी

हो ची मिन्ह सिटी : पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणारी एम. सी. मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पाचवे सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करताना मंगळवारी अंतिम फेरीत प्रवेश केला, तर सोनिया लाथेरनेही अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.भारतासाठी आजचा दिवस मात्र निराशाजनक ठरला. चार वेळा सुवर्णपदक पटकावणारी एल. सरितादेवीला (६४ किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत सरितादेवीला चीनच्या दोऊ डॅनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.मेरी कोमने जपानच्या सुबासा कोमुराचा ५-० ने पराभव केला. तिने सहापैकी पाचव्यांदा या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. फायनलमध्ये मेरी कोमला उत्तर कोरियाच्या किम हयांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. हयांगने मंगोलियाच्या एम. म्यांगमारदुलामचा पराभव केला. अंतिम फेरीत विजय मिळवला तर मेरी कोमचे ४८ किलो वजनगटात पहिले आशियाई सुवर्णपदक राहील.राज्यसभा सदस्य, आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती ३५ वर्षीय मेरी कोम पाच वर्षे ५१ किलो वजनगटात सहभागी झाल्यानंतर ४८ किलो वजनगटात परतली आहे. जपानच्या बॉक्सरने तिच्याविरुद्ध बचावात्मक खेळ केला. मेरी कोमने दुसºया फेरीत आक्रमक खेळ करीत विजय मिळवला.सोनियाने आक्रमक प्रतिस्पर्धी उझ्बेकिस्तानच्या योदगोरोय मिर्जाएवाचा पराभव केला. शिक्षाने (५४ किलो) आपल्या गटात कांस्यपदक पटकावले. तिला चिनी ताइपेची माजी युवा विश्व चॅम्पियन लिन यू तिंगविरुद्ध उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. प्रियंका चौधरी (६० किलो) कांस्यपदकाची मानकरी ठरली. तिला उपांत्य फेरीत कोरियाच्या ओ यिओंजीने पराभूत केले. (वृत्तसंस्था)