शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

मुंबईकर तरुणाचा पराक्रम; अवघ्या एका मिनिटात मारले ४३४ स्ट्रेट पंच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 11:14 PM

आशिषच्या विक्रमी कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया या संस्थेने घेतली असून या संस्थेचे सिनियर एज्युकेटर संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांनी आशिषला प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविले.

मुंबई : बॉक्सिंग हा ताकद आणि बुद्धीचा खेळ. यात प्राविण्य मिळवण्यासाठी आयुष्याची कित्येक वर्षे खर्ची घालावी लागतात. त्यानंतरच एखादा खेळाडू यात पारंगत होतो. मात्र, कांदिवलीतील चाळीत राहणाऱ्या तरुणाने अवघ्या काही महिन्यांच्या सरावानंतर एका मिनिटात ४३४ स्ट्रेट पंच मारून बॉक्सिंगमध्ये विश्वविक्रम केला आहे. आशिष रजक असे या तरुणाचे नाव आहे.आशिष हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर हे त्याचे मूळ गाव. सध्या कांदिवलीतील शिवनेरी चाळीत तो आई-वडिलांसोबत राहतो. घरात खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आशिषने हे यश मिळवले आहे. आशिषच्या या विक्रमी कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया या संस्थेने घेतली असून या संस्थेचे सिनियर एज्युकेटर संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांनी आशिषला प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविले.आपल्या विश्वविक्रमाबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्याने सांगितले की, ‘लहानपणापासूनच मला काहीतरी जगावेगळे करण्याची इच्छा होती. पण काय करावे हे समजत नव्हते. मार्शल आर्टसमध्ये आवड निर्मान झाल्यानंतर ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. गेल्या ४ वर्षांपासून मी मार्शल आर्टस शिकत आहे. यादरम्यान प्रशिक्षक मनोज गौंड यांनी मला स्ट्रेट पंचवर भर देण्याची सूचना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मेहनत केली आणि यशाला गवसणी घातली.’याआधीचा विक्रम१८ वर्षांखालील गटाचा विचार करता याआधी एका मिनिटांत ३३४ स्ट्रेट पंच मारण्याच्या विक्रमाची गिनिज बूकमध्ये नोंद होती. मात्र, आशिषने एका मिनिटांत तब्बल ४३४ स्ट्रेट पंच मारत नवा विक्रम प्रस्थापीत केला आहे. याविषयी त्याने सांगितले की,  ‘प्रशिक्षकांनी ४५० चे टार्गेट दिले होते. इतके पंच बसले असते. तर अन्य कोणी सहजासहजी हा विक्रम मोडू शकला नसता. मात्र, ४३४ पंचचा विक्रम मोडणेही एखाद्याला सहसा शक्य होणार नाही.’माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील आणि सर्व प्रशिक्षकांना जाते. लहानपणापासूनच जगावेगळे काहीतरी करण्याची इच्छा होती. कौतुकाचा वर्षाव होत असल्याने मेहनतीचे फळ मिळाल्याचे समाधान वाटते आहे.-   आशिष रजक, विश्वविक्रमवीर