शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

अर्जेंटिनाला फायनलमध्ये ‘तिखट’ आव्हान

By admin | Updated: June 24, 2016 01:15 IST

गत चॅम्पियन चिलीने पूर्वार्धात केलेल्या दोन जबरदस्त गोलच्या जोरावर पावसामुळे बाधित झालेल्या सेमीफायनलमध्ये कोलंबियाला २-० ने हरवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम

शिकागो : गत चॅम्पियन चिलीने पूर्वार्धात केलेल्या दोन जबरदस्त गोलच्या जोरावर पावसामुळे बाधित झालेल्या सेमीफायनलमध्ये कोलंबियाला २-० ने हरवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत चिलीसमारे सलग दुसऱ्यांदा अर्जेंटिनाशी भिडावे लागेल. रविवारी न्यू जर्सी येथील ईस्ट रुदरफोर्ड मैदानावर या दोन बलाढ्य संघांमध्ये अमेरिका खंडाचा बादशाह बनण्यासाठी झुंज रंगणार आहे.तत्पूर्वी, अर्जेंटिनाने यजमान अमेरिकेला ४-० ने एकतर्फी हरवून अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्यांदा चिली आणि अर्जेंटिना कोपा अमेरिका स्पर्धेच्या किताबासाठी अंतिम फेरीत झुंजणार आहेत. गेल्या वेळी चिलीने अर्जेंटिनाला ४-१ असे हरवून अजिंक्यपद मिळविले होते.एरानगुएजचा पहिला धमाकाचिलीचा मिडफिल्डर चार्ल्स एरानगुएजने सातव्या मिनिटाला पहिला गोल ठोकून १-० अशी आघाडी मिळवून दिली. कोलंबियाचा मिडफिल्डर कुआड्राडो याचा भरकटलेला हेडर थेट एरानगुएज याच्याजवळ पोहोचला. त्याने या संधीचा फायदा उठवून कोलंबियाचा उपकर्णधार आणि गोलकीपर डेव्हिड ओसपिना याला चकवून गोल डागला.यानंतर ११व्या मिनिटाला जोस पेड्रो फ्युनजालिदाने दुसरा गोल नोंदवून आघाडी २-० अशी केली. गोलपोस्टला धडकून परत आलेल्या चेंडूला पेड्रोने चपळाईने पुन्हा गोलपोस्टमध्ये धाडले. यामुळे कोलंबिया प्रचंड दबावाखाली आला. त्यानंतर उत्तरार्धात पावसामुळे खेळ दोन तासांसाठी थांबविण्यात आला. पाऊस थांबल्यानंतर दोन्ही संघ पुन्हा मैदानात उतरले. परंतु, ०-२ ने पिछाडीवर पडलेल्या कोलंबियन संघाला फारशी करामत दाखवता आली नाही. ५६व्या मिनिटाला कोलंबिया संघाला गोल करण्याची संधी होती; परंतु त्यांना ती साधता आली नाही. मिडफिल्डर आर्टुरो विडाल आणि मार्सेलो डियाज या दोन खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या चिलीला अर्ध्या तासानंतर पेड्रो हर्नांडिस जखमी झाल्याने आणखी एका खेळाडूला मुकावे लागले. कोलंबियाकडून जेम्स रॉड्रिग्जच्या दोन चांगल्या प्रयत्नांना गोलमध्ये रूपांतरित करता न आल्याने त्यांचा गोलफलक कोराच राहिला. कोलंबियाला आता तिसऱ्या स्थानासाठी प्लेआॅफ लढतीत अमेरिकेशी शनिवारी लढावे लागेल. (वृत्तसंस्था)