शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Argentina in FIFA World Cup Final : 'या' सीक्रेट ड्रिंकचा चाहता आहे अर्जेंटिना संघ; अपल्या देशातून कतारला नेला मोठा साठा, अशी आहे खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 13:42 IST

अर्जेंटिनाच्या विजयात या हर्बल ड्रिंकचाही महत्त्वाचा वाटा आहे...!

नवी दिल्ली - अर्जेंटिना संघ फीफा वर्ल्ड कपच्या (Fifa World Cup 2022) फायनलमध्ये पोहोचला आहे. या टोर्नामेंटमध्ये अर्जेंटिनाने पहिल्या सेमीफायनलसामन्यात क्रोएशियाचा 3-0 ने पराभव केला होता. लियोनेल मेसीने एक तर ज्युलियन अल्वारेजने 2 गोल केले होते. हे यामुळेही महत्वाचे आहे, की मेस्सीला एक खेळाडू म्हणून अतापर्यंत वर्ल्डकपचा खिताब जिंकता आलेला नाही. या विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंसंदर्भातील अने गोष्टींनी लोकांचे लक्ष आकर्षित केले आहे.

अर्जेंटिनाच्या विजयात हर्बल ड्रिंकचाही महत्त्वाचा वाटा आहे. या ड्रिंकचे नाव आहे येरबा माटे. हे दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध ड्रिंक आहे. विशेष म्हणजे, अर्जेंटिनाचे खेळाडू तब्बल 1100 पौंड, म्हणजेच सुमारे 500 लिटर येरबा माटे घेऊन कतारला पोहोचले आहेत. आज फिफा वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात सामना होणार असल्याची माहिती आहे. अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होईल.

न्युयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, दक्षिण अमेरिकेतील येरबा माटे या खास वनस्पतीच्या पानांपासून हे हर्बल ड्रिंक तयार केले जाते. हे ड्रिंक अर्जेंटिनाशिवाय ब्राझील, पराग्वे आणि उरुग्वेमध्येही प्रचंड प्रसिद्ध आहे. येथील सर्वच दिग्गज हे पेय घेतात. अर्जेंटिनाच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ येरबा माटेचे अध्यक्ष जुआन जोस सिचोव्स्की यांनी म्हटले आहे, की येरबा माटेपासून काढा तयार करणे, ही एक कला आहे. हे आरोग्यसाठी अत्यंत चांगले आहे. तसेच यात पॉलीफेनोल असते, यात अँटीऑक्सीडेंटचे गूण असतात. खेळाडू हे रोज घेतात आणि हे त्यांच्या कल्चरमध्ये आहे. 

कतारमध्ये मिळत नाही म्हणून सोबत नेले - वर्ल्डकपसाठी येण्यापूर्वी हे पेय कतारमध्ये कसे उपलब्ध होईल, ही चिंता खेळाडूंना होती. यामुळे त्यांनी आपल्यासोबतच हे पेय आणले आहे. ब्राझीलचा संघ 26, तर उरुग्वेचा संघ 530 पौंड पेय घेऊन कतारला पोहोचला आहे. याशिवाय अर्जेंटिनाचा संघ जवळपास 1100 पौंड पेय घेऊन कतारला पोहोचला आहे. अर्जेंटिना संघात खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ, असे मिळून एकूण 75 लोक आहेत. 

यासंदर्भात अर्जेंटिनाचा मिडफील्डर अॅलेक्सिस मॅक एलिस्टेरला विचारण्यात आले, की इतर संघातील खेळाडू ग्रीन टी घेतात, मग आपण येरबा माटे का घेता? यावर तो म्हणाला, यात कॅफीन असते. तरीही आम्ही, एकमेकांसोबत जोडलेले रहावे, यासाठी हे घेतो. महत्वाचे म्हणजे, अरेजंटिना संघ घेळाडूंना आवडणाऱ्या चवीनुसार, येरबा माटे घेऊन पोहोचला आहे, असे अर्जेंटिना संघाचे प्रवक्ते निकोल्स नोवेला यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Lionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉलArgentinaअर्जेंटिनाBrazilब्राझील