शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अंजूमची ‘खेलरत्न’, जसपालची द्रोणाचार्यसाठी शिफारस, नेमबाजी महासंघाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 01:48 IST

२००८ ला नेमबाजी सुरू करणाºया चंदीगड येथील २६ वर्षांच्या मुदगिलने दहा मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे.

नवी दिल्ली : दिग्गज नेमबाज अंजूम मोगदिल हिच्या नावाची सर्वोच्या क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्नसाठी तसेच कोच जसपाल राणा याच्या नावाची सलग दुसऱ्यांदा द्रोणाचार्य पुरस्कारासाठी भारतीय राष्टÑीय रायफल संघटनेने(एनआरएआय) शिफारस केली आहे. अर्जुन पुरस्कारांसाठी पिस्तूल चॅम्पियन सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांची नावे पाठविली आहेत.महासंघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चारही नावे एकमताने पाठविली आहेत. जसपालला यंदा द्रोणाचार्य पुरस्कार मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. २००८ ला नेमबाजी सुरू करणाºया चंदीगड येथील २६ वर्षांच्या मुदगिलने दहा मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे. मागच्यावर्षी अंजूम आणि दिव्यांश पंवार यांनी म्युनिच आणि बीजिंगमध्ये विश्वचषकात मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण जिंकले होते. खेलरत्न पुरस्कारापोटी पदक, प्रमाणपत्र आणि साडेसात लाख रुपये रोख रक्कमदिली जाते.मागच्यावर्षी ४३ वर्षांच्या जसपालची द्रोणाचार्यसाठी निवड न झाल्यावरून वाद उत्पन्न झाला होता. मनू भाकर, सौरभ चौधरी आणि अनीश भानवाला या खेळाडूंच्या जडणघडणीत जसपालची भूमिका मानली जाते. या पुरस्कारादाखल पाच लाखांची रोख मिळते. अभियंता, वकील आणि नंतर नेमबाज असा प्रवास करणारा ३० वर्षांचा वर्मा आॅलिम्पिक कोटा मिळविणारा भारताचा पाचवा खेळाडू आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मागच्यावर्षी ७ एप्रिल रोजी त्याने विश्वचषकात सुवर्ण जिंकून ही कामगिरी केली होती. १६ वर्षांच्या सौरभ चौधरी याने देखील विश्वचषकात विक्रमी कामगिरीसह सुवर्ण जिंकले शिवाय आॅलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले होते. सौरभने विश्वचषकात आतापर्यंत दोन सुवर्ण जिंकली आहेत. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Shootingगोळीबार