दुबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा तीन वर्षांसाठी फेरनिवड झाली. महान फलंदाज राहुल द्रविड याला सदस्य बनविण्यात आले आहे.कुंबळे २०१२ मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष बनला होता. आता २०१८ पर्यंत या पदावर कायम राहील. द्रविड आणि लंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांना सदस्य बनविण्यात आले आहे. लॉर्डस्वर ३१ मे तसेच १ जून रोजी होणाऱ्या आयसीसी बैठकीत सर्वजण सहभागी होतील. कसोटी कर्णधारांनी प्रतिनिधी म्हणून द्रविडला निवडले आहे. (वृत्तसंस्था)
अनिल कुंबळे यांची अध्यक्षपदी फेरनिवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 01:51 IST