शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनिल बिलावाने मिळविला 'नवोदित मुंबई श्री'चा किताब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 16:04 IST

परळच्या अनिल बिलावाने 'नवोदित मुंबई श्री'चा किताब पटकावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

मुंबई : परळच्या अनिल बिलावाने 'नवोदित मुंबई श्री'चा किताब पटकावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.  मुंबईच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेत शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आाणि फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची नवोदित मुंबई श्री स्पर्धा गतवर्षीप्रमाणे यंदाही खुल्या मैदानात आयोजित करण्यात आली. 195 नवोदित शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या प्रत्येक गटात 30-35 स्पर्धकांनी आपली ताकद दाखवली.  

प्रत्येक गटात कंपेरिझनप्रत्येक गटात 30-35 खेळाडू असल्यामुळे आधी 10 खेळाडूंची आणि मग पाच खेळाडूंची निवड करण्यासाठी जजेसना आपले कसब पणाला लावायला लागले. प्रत्येक गटात एकाच ताकदीचे 4-5 खेळाडू असल्यामुळे गटविजेता निवडतानाही त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. प्रत्येक गटांमध्ये गटविजेत्यासाठी अव्वल दोन-तीन खेळाडूंमध्ये कंपेरिझनही करण्यात आली. इतक्या प्रचंड सहभागाच्या स्पर्धेतून गटविजेत्याची निवड करणे आमच्यासाठी फार आव्हानात्मक असल्याचे गुणलेखक सुनील शेगडे यांनी सांगितले.   

अनिल बिलावासमोर सारे फिकेस्पर्धेचे सातही गट अत्यंत चुरशीचे झाले. मात्र जेतेपदासाठी जेव्हा हेमंत भंडारी, विपुल सावंत, रूपेश चव्हाण, मकरंद दहिबावकर, अनिल बिलावा, राजेश खाटीकमोट आणि विकास म्हापसेकर हे सातही खेळाडू उतरले तेव्हा 75 किलो वजनीगटाच्या गटविजेत्या अनिल बिलावासमोर सारेच फिके पडले. या नवोदित खेळाडूने साऱ्यांनाच आपल्या प्रेमात पाडले.  

नवोदित मुंबई श्री 2018 चा निकाल55 किलो वजनी गट : 1. हेमंत भंडारी, 2. नितेश कोळेकर, 3. संजय आंग्रे, 4. अक्षय साळुंखे, 5. प्रशांत सडेकर.60 किलो : 1. विपुल सावंत, 2. महेश कांबळे, 3. सुमीत यादव, 4. राजेश निर्मल, 5. अजित पद्मन.65 किलो : 1. रूपेश चव्हाण, 2. अभिषेक पाटील, 3. सलीम शेख, 4. निलेश कासले, 5. अजय पोळ.70 किलो : 1. मकरंद दहिबावकर , 2.  शेख कादर बादशाह, 3. सुनील गुरव, 4. कुशल सिंग, 5. उत्तम मांगले.75 किलो : 1. अनिल बिलावा, 2. महमद हुसेन खान, 3. हेमंत कंचावडे, 4. चिलयुहुरशी आनंदसत, 5. अरम सिंग.80 किलो : 1. राजेश खाटिकमोट, 2. शब्बीर शेख, 3. पवन सोमई, 4. तौसिफ अंसारी, 5. प्रतिक मोहिते.80 किलोवरील : 1. विकास म्हापसेकर, 2. प्रतिक यादव, 3. अभिषेक माशेकर, 4. प्रशांत वाळुंज, 5. महेश सुवर्णा उत्कृष्ट पोझर : महमद हुसेन खान नवोदित मुंबई श्री : अनिल बिलावा  

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठव