शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भारताची युवा मेडलिस्ट Sheetal Devi नं नाकारले होते आनंद महिंद्रा यांच्याकडून मिळणारे गिफ्ट; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 13:50 IST

खुद्द आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भातील गोष्ट शेअर केली आहे. एवढेच नाही तर...

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उतरलेल्या प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यातील संघर्षाची स्टोरी प्रेरणादायी आहे. त्यातही भारताची १७ वर्षांची पॅरा तिरंदाज शीतल देवीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. दोन्ही हात नसलेली ही भारताची लेक पायांनी अचूक वेध साधण्यात पारंगत आहे. राकेश कुमार यांच्या साथीनं तिने मिश्र सांघिक कंपाउंड तिरंदाजीत भारताला कांस्य पदकाची कमाईही करून दिली. 

भारताची युवा पॅरालिम्पिक चॅम्पियन ठरलीये शीतल 

या पदकासह भारताकडून सर्वात कमी वयात पदक जिंकण्याचा विक्रमही तिच्या नावे झाला. फोकोमेलिया या दुर्मिळ आजाराशी लढणारी शीतल ही एकमेव महिला तिरंदाज आहे जी दोन्ही हात नसतानाही या खेळात आपली छाप सोडताना दिसते. पॅरालिम्पिक स्पर्धेत तिने जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता येते, हे दाखवून दिले आहे.   

आनंद महिंद्रा यांनी २०२३ मध्येच कार गिफ्ट करण्यासंदर्भात व्यक्त केली होती इच्छा  

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील देशाच्या या लेकीच्या जिद्दीला सलाम केला आहे. खेळाच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आनंद महिंद्रा नेहमीच आघाडीवर असतात. पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवणाऱ्या शीतल देवीला देखील त्यांनी २०२३ मध्येच कस्टमाइज्ड कार ऑफर केली होती. पण त्यावेळी शीतलनं गिफ्टला नकार दिला होता. खुद्द आनंद महिंद्रा यांनीच यासंदर्भातील गोष्ट शेअर केली आहे.

२०२५ मध्ये शीतलला गिफ्ट मिळणार, पण वर्षभर वाट का पाहायची?

आनंद महिंद्रा यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) पॅरा तिरंदाज शीतल देवी संदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की,  भारताच्या  युवा पॅरा अ‍ॅथलिट्सला त्यांनी कस्टमाइज्ड कार देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी १७ वर्षीय शीतल हिने कार गिफ्ट स्वरुपात स्विकारण्यास नकार दिला होता.  वयाच्या १८ व्या वर्षी यासंदर्भात विचार करेन, असे ती म्हणाली होती. २०२५ मध्ये दिलेला शब्द पूर्ण करेन. या क्षणाची मी अगदी उत्सुकतेनं वाट पाहत आहे, असा उल्लेख आनंद महिंद्रांनी खास पोस्टमध्ये केला आहे.