केदार लेले
बिल्बाव मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या तिस:या फेरीत अर्मेनियाचा लेवॉन अरोनियन याने भारताच्या विश्वनाथन आनंदला बरोबरीत रोखले, तर एका आकर्षक डावात रसलन पोनोमारिओव याने स्पेनच्या वॅलेजो पॉन्सवर विजय मिळवत आपले खाते उघडले.
स्पेनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या तिस:या फेरीत लेवॉन अरोनियन विरुद्ध पांढ:या मोह:यांनी खेळताना विश्वनाथन आनंदने डावाची सुरु वात रॉय लोपेझ पद्धतीने केली. या डावामध्ये आनंदने 11 व्या चालीवर बी 4 चाल रचत, सिंक्वेफिल्ड बुद्धिबळ स्पर्धेत कॅरुआना विरुद्ध अरोनियन यांच्यातील डावाची पुनरावृती टाळली़ पुढील चालींमध्ये मोह:यांची अदलाबदली होत राहिली आणि 31व्या चालीवर विजरा-विजरी झाली. हे सर्व होत असताना पटावर कायम समानता दिसून आली. अखेर 34 चालींनंतर समसमान परिस्थितीमध्ये उभयतांनी डाव बरोबरीत सोडवायचा निर्णय घेतला. स्पर्धेत तिस:या फेरीअखेर विश्वनाथन आनंदचे 7 गुण झाले आहेत, तर लेवॉन अरोनियनचे 5 गुण झाले आहेत. रसलन पोनोमारिओवचे 3 गुण झाले आहेत आणि वॅलेजो पॉन्सचा एक गुण झाला आहे.